
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडच्या हिवाळी परीक्षा – 2022 चालू आहेत . या परीक्षा केंद्रावर बी.ए., बी.एस्सी , बी फार्मसी , एम.ए. बहिस्थ शाखेचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत . कै.भिमराव चव्हाण कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय , चव्हाणवाडी , शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय , मुखेड , स्व.लिलावती आव्हाड डी.फार्मसी. काँलेज , होकर्णा , शिवप्रसाद डी.फार्मसी.काँलेज , मुखेड , ( नियमित ) , महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड ( बहिस्थ ) ठिकाणचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत . एकुण 1350 इतक्या संख्येचे तालुक्यातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र सुरळीतपणे चालू आहे . पर्यवेक्षक , दक्षता पथक यांच्या अथक परिश्रमामुळे शांतेत व नियमानुसार परीक्षा घेतली जात आहेत .
परीक्षेच्या यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे , कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , शंकरनगर येथील सहकेंद्रप्रमुख प्रा.डॉ. व्ही.ए.पवळे , सहाय्यक केंद्रप्रमुख प्रा.डॉ. पी.डी.राठोड , प्रा.डॉ. जी.वाय.कहाळेकर , अंतर्गत दक्षता पथकात प्रा.सी.बी.साखरे , प्रा.डॉ. डी.के.आहेर , प्रा.डॉ. एम.के.राऊत , प्रा.डॉ. ए.एन.गित्ते , प्रा.डॉ. जे.जी.कहाळेकर आणि परीक्षा विभागात प्रा.डॉ. विनोद कोटीवाले , प्रा.डॉ. हरिदास भोईवार , तांत्रिक साहाय्य श्रीराम पताळे , दिनानाथ नालापल्ले , गजानन पोलावार यांनी परिश्रम घेत आहेत .