दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील आंबी येथे दि २९ रोजी पार पडलेल्या तालुका स्तरीय लांब उडी मारने,धावने या स्पर्धेत शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथिल विद्यार्थ्यांनी तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली तसेच त्यांची पुढे उस्मानाबाद येथे जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
यामध्ये आखिलेश जमादार (लांब उडी मारने )भुम तालुक्यात प्रथम क्रमांक,रुपनवर विशाल( १०० मिटर धावने) दुसरा क्रमांक, कुटे आर्जून २०० मिटर,८०० मिटर मध्ये प्रथम क्रमांक,जाधव आनंद बबन २००,८०० मध्ये दुसरा क्रमांक व लांब उडी दुसरा क्रमांक, कोळेकर सज्जन ४०० दुसरा क्रमांक, जठार रोहीत १५०० मिटर प्रथम क्रमांक, मुंढेकर अभिजित १५०० मिटर दुसरा क्रमांक, कुमारी हुरकुडे सानिका ४०० मिटर प्रथम क्रमांक, ८०० मिटर दुसरा क्रमांक, पवार साक्षी ८०० प्रथम क्रमांक पटकावला असून सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
यामुळे शंकरराव पाटील महाविद्यालय, भुम शहराचे नाव सर्व विद्यार्थ्यांनी लौकीक केलेले असुन सर्वञ त्यांचे कौतुक होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण जगताप बी. के. यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले आहे. त्यांच्या यशाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
याप्रसंगी शंकरराव पाटील महाविद्यालय वतीने प्राचार्य संतोष शिंदे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
