
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
भारत देश हा शेती प्रधान देश असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला कोणीच धावून येत नाही व शेतकऱ्यांची अवस्था बिघडत असताना, वरच्यावर शेतकऱ्याच्या मदतीला ना प्रशासन धावून येतात न सामान्य माणूस अशीच घटना देगलूर तालुक्यातील कामाजीवाडी येथे घडली असून एक वर्षाखाली म्हणजे दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रपत्रक अ. रस्ता मजबुतीकरण १) कामाजीवाडी ते मुनेगाव मंदिर रस्ता एक किलोमिटर, प्रपत्रक ब. अतिक्रमण मुक्त करणे व कच्चा रस्ता तयार करणे १) कामाजीवाडी ते कर्नाटक हद्दी पर्यंत अडीच किलोमिटरचा रस्ता, २) बाबू तोटे ते संजय बावगे यांच्या शेतीपर्यंतचा तिन किलोमिटरचा रस्ता तयार करणे यावर चर्चा करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले असताना आजतागायत या कामाला सुरुवात झाली नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील माल घरी घेऊन येण्यासाठीरस्त्याची गरज असताना शासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. शेतीच्या मशागतीपासून ते पेरणीसाठी बी बियाने खते, राशीचे माल आनेपर्यंत शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागत आहे, शेताला जाण्यासाठी रस्ता असला म्हणजे शेतकऱ्यांचे अर्धे काम कमी होते व सर्व त्रासापासून मागील सुटका होते, परंतू शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणीच लक्ष केंद्रित करीत नसल्याची खंत कामाजीवाडी येथील शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी या गावातील शिवाजी वट्टमवाड यांच्याशी संपर्क साधला, यांनी सांगितले की या पानंद रस्त्यासाठी फाईल तयार करून पंचायत समिती मार्फत मंत्रालयातून मंजूरी आणल्यानंतरच कामाची सुरुवात होते, आणखी ती मंजूरी भेटली नाही, ती मंजूरी भेटल्यानंतरच कामाला सुरुवात होईल असे सांगितले. कामाची सुरुवात आणखी तरी चालू होणार नसून, या भागातील शेतकरी वर्गाची समस्या अशीच राहील की काय असे शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.