
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
जीवनातील उपलब्ध साधन आणि त्याचा अपव्यय न होऊ देता केलेला योग्य वापर हेच यशस्वी जीवनाच गमक आहे .आयुष्यात समज आणि उमज हि योग्य वेळी आलीच पाहिजे.जीवन सार्थक आणि निरर्थक या दोन परस्परविरोधी दिशेच्या टोकाला फिरत असतं एक तर सार्थकी लागत किंवा निरर्थक ठरत.पण या संदर्भात आपण कसं आचरण केले त्यावर जीवनातील निर्णयाचा केंद्रबिंदू अंवलबुन असतो. याच दरम्यान महत्वाची बाब ही आहे कि अंगातील ताकद, खिशातील पैसा, आणि आयुष्यातील अनमोल वेळ जपून वापरला तर मग मात्र आयुष्य सार्थकी लागत आणि जर जपुन वापरलं नाही तर मग आयुष्य निरर्थक ठरत आणि पश्चात्ताप करावा लागतो. तसं पहिल तर पश्चात्ताप हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.याच कारणही तसंच आहे योग्य वेळी योग्य भुमिका हि घेता आलीच पाहिजे वेळ आणि भुमिका चुकीली कि मग गडबड होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. जीवनातील आपली भुमिका आपले निर्णय आणि येणारे परिणाम हे जवळपास सारखेच असतात जशी भुमिका तसा परिणाम याला कोणीही अपवाद असु शकत नाही. म्हणून चांगली योग्य भुमिका हि सदैव घेता आली पाहिजे.जीवनाविषयी सदैव सकारात्मक असल पाहिजे आपल्या मध्ये असणारी ऊर्जा हि योग्य आणि सकारात्मक कार्यासाठी कारणी लावली पाहिजे.महणजे आपल्याला नेहमीच सकारात्मक परिणाम पण पाह्यला मिळतील.तस पहिल तर आयुष्य हे मर्यादित असतं . आणि मर्यादित वेळेत खुप काही करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पण याच दरम्यान योग्य वेळ साधता आली पाहिजे ज्याने योग्य वेळ साधली तो हिरो ठरतो.आणि ज्याला योग्य वेळ साधता आली नाही . त्याला पश्चात्ताप करावा लागतो.जर योग्य वेळ चुकली तर आपल्या मध्ये असणारी सर्व अंगभूत कौशल्य सुद्धा निरुपयोगी ठरतात . म्हणून आपल्या जीवनातील उपलब्ध आयुध हि योग्य पद्धतीने योग्य वेळी वापरली तर आपला विजय हा निसर्ग पण रोखु शकत नाही.महणुन आपल्या अंगात असणारी शक्ति हि जर योग्य आणि सात्विक कारणासाठी वापरली तर स्व कल्याण आणि लोककल्याण होईल आणि जर अयोग्य कारणास्तव वापरली तर विनाशकारी घटना घडतील .तसंच आपल्याकडं असणारा पैसा संपत्ती हि योग्य आणि जपुन वापरली पाहिजे.महणजे फक्त आपलं हित आणि हितच होईल आणि आपल्यावर पश्चात करण्याची वेळ येणार नाही.आणि आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि महत्वपूर्ण बाब म्हणजे वेळ जर वेळ सदकारणी लागला तर आपलं आयुष्य सार्थकी लागत आणि जर आपला वेळ व्यर्थ वाया गेला तर मग मात्र आपल्याला डोक्यावर हात ठेवून पश्चात्ताप करण्याची गरज भासणार नाही. यासाठी ज्ञान मार्ग भक्ति मार्ग आध्यत्मिक सात्विक वृत्ती आणि वैचारिक प्रगल्भता हि ठेवली तर अखंडीत जीवन मार्गावर कुठेही आपल्या कडून चुकीचे आचरण आणि साधनांचा अपव्यय होत नाही आणि साधनांचा अपव्यय झाला नाही तर मग मात्र आपल्याला पश्चात्ताप होणार नाही.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301