
दैनिक चालू वार्ता मुखेड ग्रामीण प्रतिनीधी – शिवकुमार बिरादार
मुखेड मतदार संघातील मसलगा सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी शेतीनिष्ठ कृषीरत्न विश्वंभर पाटील मसलगेकर यांची तर व्हाईस चेअरमन पदी अनिल घोगरे यांचे 28 डिसेंबर रोजी बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
मसलगा सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली विश्वंभर पाटील मसलगेकर यांच्या नेतृत्वाखाली दत्ता प्रभू शेतकरी विकास पॅनलची निर्मिती करण्यात आली.माजी पं स.उपसभापती पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या विरोधात दोन गटात निवडणूक झाली.223 मतदार असलेल्या सोसायटीची मतदान प्रक्रिया 14 डिसेंबर रोजी बुधवारी पार पडली या दत्ता प्रभू पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले एक महिला उमेदवार विठाबाई नरवाडे पूर्वीच्या बिनविरोध निवडून आल्या दत्तकृपा पॅनलचे विशंभर पाटील मसलेकर अनिल घोगरे, गंगाधर वडजे, धोंडीबा वडजे, पंढरी वडजे,भाऊसाहेब वडजे, विनायक वडजे, संतोष वडजे, विजय झाले दोन जागांवरील उमेदवाराचा अर्ज छाननी मध्ये बाद झाले व्ही.जे.एन.टी. प्रवर्गातील एक जागा रिक्त राहिली आहे. 28 रोजी निवडणुका निर्णय अधिकारी बी व्ही जवादवार यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन,व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली या चेअरमनपदी विश्वंभर पाटील यांची तर व्हॉइस चेअरमन पदी अनिल घोगरे यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर समर्थ कार्यकर्त्यामध्ये गुलाल उधळून फटाक्याच्या आतिषबाजी करत मिठाईवाटप करून आनंद उत्सव साजरा केला व तसेच जिजाऊ ग्रुप मुखेड च्या वतीने विश्वंभर पाटील वडजे, अनिल घोगरे या दोघांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विश्वंभर पाटील मसलगेकर व्यंकटराव वडजे, विठ्ठल वडजे, नारायण वडजे, अनिरुद्ध वडजे, बापूसाहेब वडजे, वडजे डॉ, विश्वंभर वडजे, बाबुराव वडजे, व्यंकट पाटीलवडजे,सुधाकर वडजे, वज्रधर वडजे, शिवाजी वडजे मारुती वडजे दत्ता नरवाडे अशोक चापूलकर,रमेश चापूलकर, बळी पाटील वडजे,मनोहर वडजे गोविंद घोगरे किशन इंगोले यशवंत बोडके, दत्तात्रय कुलकर्णी, हेमंत पवार,यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.