
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – कंधार आगारातुन सोडण्यात येणाऱ्या लोहा – पेनुर – पूर्णा बसमधील काही फेऱ्या खंडीत ( बंद ) करण्यात आल्या असून त्या तात्काळ चालु करण्यात याव्यात अशी मागणी सुनेगाव , भांद्रा , पांगरी , पेनुरसह परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
कोरोना काळात दोन वर्षे शाळा व ग्रामीण भागातील शेतकरी प्रवासी यांचा बससेवा बंद असल्याने संपर्क तुटला परंतु पेनुर पूर्णा या दोन्ही बसच्या ज्या अधिक फेऱ्या होत्या त्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्याने शाळेय विद्यार्थी , वयोवृद्ध व्यक्ती , शेतकरी , मजुरदार प्रवासांसह अनेकांना या गोष्टीचा सामना करावा लागत आहे .
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन व शेतकऱ्यांची बाजारपेठ बंद असल्यामुळे व बससेवा बंद असल्याने पाहीजे तेवढा संपर्क सामान्य जनतेचा एस टी सी आला नाही पण आतातरी तात्काळ या बससेवाच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी अशी मागणी सामान्य जनतेतुन होत आहे .
कंधार आगारप्रमुख कुंभकर्ण झोपेत
________________________
कंधार आगारातुन सोडण्यात येणाऱ्या पेनुर – पुर्णा बसच्या फेऱ्यात वाढ करण्यात यावी असे निवेदन कंधार अगार प्रमुखाला पेनुर येथील ग्रामस्थांनी दिले होते अद्याप आगारप्रमुखांनी या निवेदनाची दखल पण घेतली नसुन आगारप्रमुख कुंभकर्ण झोपेतुन उठणार कधी अशी चर्चा जनतेतून ऐकायला मिळत आहे.