
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार ग्रामीण भागातील जनतेने प्रा.साहेबराव बेळे साहेब व श्री.गोविंद पांढरे सर यांचे अभिनंदन केले असून हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.प्रा.साहेबराव बेळे साहेब यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डाॅ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात २०२२ साठी चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत.आणी संपादक आहेत.तसेच पेठवडज येथील श्री.गोविंद पांढरे सर यांना अमेरीका बहुमान मिळाला असून एल.आय.सी.मध्ये त्यांनी गोरगरीब जनतेसाठी कार्य केले आहे.दोन्ही मान्यवर मंडळींचे कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेनी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.