
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:१७/१२/२०१५ रोजीची. मरखेल हद्दीत शेतातून तुरीच्या शेंगा आणण्यासाठी महिला गेली असता गावातीलच वामन निवृत्ती पवार नामक व्यक्ती गुरे चारवण्यास त्याच शेताच्या दिशेने गेला ज्या शेतात ती महिला गेली होती
महिला एकटी पाहून पवार याने जाणून बुजून महिलेस हटकत तुरीच्या शेंगा विषयी विचारत खिशातून शंभर रुपये काढून महिलेस देण्याचा प्रयत्न केला. संबंधित पैसे कशासाठी देता अशी विचारना करताच पवार याने महिलेसोबत अश्लील चाळे करीत विनयभंग केला. दोघांच्या या झटापटीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व मन्याचा हारदरम्यान वळग रस्त्यावरून एक इसममोटारसायकलने येताना पाहतात पवार हा गुरेढोरे तेथेच सोडून प्रसार झाला.
दि. १७ / १२ / २०१५ रोजी यासंबंधी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यासंबंधी दिनांक २६/ १२ / २०२२ रोजी देगलूर न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एन. खान यांनी वामन निवृत्ती पवार यांच्या विरोधात सादर केलेल्या दोषारोपाच्या आधारावर निर्णय देत पवार यास एक वर्षाचा कारावास तर दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ए. जे. शेख यांनी चांगल्या प्रकारे हाताळले. तर जमादार प्रभाकर गुडमलवार यांनी तपासणीस अधिकारी म्हणून कार्य केले. व तसेच कोर्ट पैरवी कर्मचारी म्हणून माजीद पठाण व गोविंद पवार यांनी काम पाहिले.