
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
शालेय क्रीडा स्पर्धेचे अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेज गौडघर येथे आयोजन करण्यात आले होते या वेळी माजी प्राचार्य जावेद शेख सर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन( रिबीन ) फीत कापून करण्यात आले, तसेच या वेळी गावातील प्रतिष्ठित मान्यवर मुस्लिम समाज अध्यक्ष अक्रम साठविलकर, उपाध्यक्ष निजाम भालदार, शाहीन कल्वचे, मोईज गजगे, नईम साठविलकर, खासिम खानजादे, अर्शद जामदार, माहमूदमिया गजगे, इम्तियाज मणियार, शबीरभाई मुर्तजा, ऐजाज पेणकर, अमीन नाडकर, प्रमोद भुवड इत्यादी मान्यवर उपस्थित होते शाळेचे प्राचार्य इम्रान शेख सर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्य देऊन स्वागत केले. कोरोना काळात कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत मात्र या वर्षी विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर एक प्रकारचा खूपच आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांना खेळात आवड निर्माण होऊन मोबाईल मध्ये रमण्या पेक्ष्या ग्राउंडवर रमले पाहिजे जेणे करून शाररिक वाढ होईल. व निरोगी पिढी घडेल असे आव्हान विदयार्थ्यांना जावेद सर यांनी केले व तालुका स्पर्धेत विद्यार्थ्याने आपल्या शाळेचे नाव लौकिक केले त्या बदल हि कौतुक केले. कार्यक्रमाची सुरवात हि ईश्वराच्या नाम सम्रनाणी करण्यात आली.सफवान नजीर या विद्यार्थ्यांनी व मिश्रा सी. बी यांनी गाईले विद्यार्थ्यांना खेळप्रती शपथ सयद तकदीस यांनी दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जुबेर यांची केले तर आभार शेख रईस सर यांनी मांडले.