
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
राजेगाव ता . दौंड :
दिव्य समाज निर्माण संस्था
वतीने
आज राजेगांव मध्ये श्री . गणेश मंदिर येथे दारू नको दुध प्या हा उपक्रम राबविला गेला . नवीन वर्षाच्या पुर्व संध्येला ३१ डिसेंबर रोजी तरुणाईचा जल्लोष असतो, मौज मजा असते , धिंगाना असतो . या जल्लोषात तरुणाईला चुकीची दिशा मिळते . तरुण पिढी वाम मार्गाला जाऊन नशा करण्यास सुरवात करते . बियर पासुन प्रवास सुरवात होतो आणि देशी बाटली पर्यंत थांबतो . पुर्णपणे तरुण पीढी उध्वस्त होते .तरुण पीढी उद्या समाजाचे देशाचे नेतृत्व करणारी असते . तरुण पिढी उध्वस्त होऊ नये म्हणून
“दारू नको दूध प्या”
या सामाजिक उपक्रम गेली सात वर्ष दिव्य समाज निर्माण संस्था संस्था या उपक्रमाचे रांजेगांव मध्ये आयोजन करत आहे . मोठ्या संख्येने गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण बंधू आणि बालगोपाल सहभागी होतात.
दिव्य समाज निर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
रमेश शितोळे – देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
यावेळी महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती पुरस्कर्ते राजेंद्र कदम , शिवसेना सेलचे दौंड तालुका अध्यक्ष डॉ . प्रमोद रंधवे
तंटामुक्ती अध्यक्ष छबू गुणबरे, पोलीस पोटील महेश लोंढे , ग्रामपंचायत सदस्य सतिश खैरे , जेष्ठ नागरीक नरहरी गुणवरे, रंगनाथ आण्णा जामले, भरत मोरे ., सुनिल, जगताप, नवनाथ भोसले, गणेश वाघमारे ,अशोक कदम, श्रिंकात पानसरे, मल्हारी बाबर, विजय कदम, निलेश लोळे, रविकिरण गायकवाड, आकाश मोरे, तानाजी शेंडगे शशिकांत राऊत , लाला साहेब भोसले ,दत्तात्रय भोसले, डॉ. राजीव कनिचे, भाऊसाहेब फरगडे , स्वामी आप्पा हिरेमठ, कल्याण ननवरे उपस्थित होते,
दिव्य समाज निर्माण संस्था नवीन वर्षापासून व्यसनमुक्त भारत सक्षम भारत असा कार्यक्रम गावोगावी राबविणार आहे.
अनेक वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम दिव्य समाज निर्माण संस्थेच्या वतीने दौंड तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात राबविले जातात .