
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
हाळदा :- हाळदा येथील बाबाराव पाटील शिंदे हाळदेकर मा.उपजिल्हा प्रमुख शिवसेना नांदेड जिल्हा यांनी डॉ.खा,आ.केशवराव धोंडगे साहेब यांच्या विषयी केला शोक व्यक्त पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा,साहेब!आपल धैर्य, कार्य, किर्ती हे स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांमध्ये झाले असेल असे महान महद भाग्यशाली विद्वतरत्न नांदेड जिल्ह्याचे भुषण महाराष्ट्र
राज्य विधानसभेत सडेतोड,
परखड ,लाजवाब,मुद्देसूद महाराष्ट्राच्या तळागाळातील सामन्यातील सामान्य जनतेचे प्रश्न
मांडून अठरा पगड जातीच्या भल्यासाठी मोर्चे सत्याग्रह, आंदोलने, उपोषण करून गोर-गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र अन्यायाच्या विरोधात लढूण आयुष्य जनतेसाठी लावले. शिक्षणाचे दालन ग्रामीण भागात वाडी, तांड्यावर निर्माण करून सामान्य जनतेला विद्या विभुषित करण्यासाठी विधानसभा, लोकसभा गाजवणारे ,महाराष्ट्राची आन बान शान, नांदेड जिल्ह्याचे भुषण, कंधार तालुक्याचे सुपुत्र कै. मा. खा. मा.आ,मुक्ताई सुपुत्र भाई केशवरावजी धोंडगे साहेब एकशे दोन वर्षाची कुटुंबाला व जनतेला दिलेली साथ सोडून ते आज कायमस्वरूपी देवदर्शनाला गेले, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे व नांदेड जिल्हातील गोर गरिबांचा पोशिंदा आधारवड गेल्याच दुःख हजारो कुटूंबाला झालेआहे.अशा या दिलखुलास दिलदार प्रेमळ मनमीळावू बहाद्दर,ज्ञानी,अष्टपैलू, विद्येचे श्रृंगार, ज्ञानाचे भांडार असलेल्या डाँ. भाई धोंडगे साहेबांना ईश्वर प्राप्ती होवो, त्यांना सद्गती लाभो, मोक्ष पदावर कायम स्वरुपी विराजमानहोवोत,त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना
शोकाकूल :-बाबाराव पाटील शिंदे
शिवसेना मा. उपजिल्हा प्रमुख नांदेड.तथा मा. चेअरमन कंधार ता शेतकरी खरेदी विक्री संघ कंधार जि. नांदेड.