
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
अलिबाग… विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचा समारोप होताच शिंदे-फडवणीस सरकारने सहा आयएएस अधिकाऱ्यांचा बिगुल वाजवला होता. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा तीन आयएएस अधिकाऱ्यांचा बिगुल वाजला. यामध्ये रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्त पदी नियुक्ती करण्यांत आली. त्यांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी पदी ऑगस्ट २०२१ मध्ये नियुक्ती झालेले जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांच्याकडे काही महिन्यांपासून कोकण आयुक्त पदाचा ज्यादा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. कल्याणकर यांची शासनांंने पदोन्नती कोकण विभागीय आयुक्त पदावर सोमवारी रात्री उशिरा त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांच्या बदलीनंतर रायगड जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मावळते जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम यांच्याकडूंन रायगड जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत खंबीरपणे उभे राहून रायगडकरांचे पालकत्व स्वीकारले होते. जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी तत्काळ सोडविले होते. कोरोना कालावधी त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता.सन २००७ तुकडीतील आयएएस अधिकारी असणारे डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणून कार्यरत होते.त्यानंतर रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून योग्य भूमिका त्यांनी बजावली होती. आता रायगड जिल्ह्याला डॉ. कल्याणकर यांच्या बदलीनंतर आता रायगड जिल्हाधिकारी पदी कुणाची वर्णी लागणार याकडे आता अधिकारी वर्गांचे चांगलेच लक्ष लागून राहिले आहे.