
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगांव- संभाजी पुरीगोसावी
उत्तर कोरेगांव तालुक्यांच्या भागातील राजकीयदृष्ट्या समजल्या जाणाऱ्या (ता. कोरेगांव ) करंजखोप पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत चवणेश्वर ग्रामविकास पॅनलला १ जागा मिळवून देत. श्रीनाथ चणेश्वर विकास आघाडीने सरपंच पदासह नऊ जिंकून दमदार विजय मिळवत. कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप ग्रामपंचायतीला राष्ट्रवादीचे वर्चस्व मिळाले. सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदी सौ. राधिका यशवंत धुमाळ आता सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. नूतन सरपंच सौ. राधिका धुमाळ यांच्यासमोर आता करंजखोप नगरीतील प्रलंबित प्रश्न व गावच्या विकास कामे तसेच करंजखोप गावातील गोरगरीब जनतेची व गावातील ग्रामस्थांकडून त्यांना प्रलंबित कामांबाबत त्यांच्यासमोर आव्हाने असणार आहेत.सौ. राधिका धुमाळ या शेतकरी कुटुंबातील असून त्यांचा स्वभाव शांत स्वंयी आणि प्रेमळ असा त्यांचा स्वभाव आहे. निश्चितच करंजखोप नगरीमधील प्रलंबित प्रश्न व गावच्या विकासाबाबत गावातील ग्रामस्थांकडून त्यांना आव्हाने असणार आहेत. त्या तब्बल ३२४ मतांच्या फरकांने त्या दमदार विजयी झाल्या. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत मा.ना. रामराजे नाईक निंबाळकर मा.ना. श्रीमंत संजीवबाबा नाईक निंबाळकर आमदार मा.ना. दीपक चव्हाण मा.ना. नितीनकाका पाटील मा.ना. लालासाहेब शिंदे मा. अविनाश धुमाळ बापू मा. शिवाजीराव धुमाळ यांच्यासह आदीं ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी श्रीमंत माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी करंजखोप गावच्या विजयी नवयुक्त सरपंच सौ.राधिका धुमाळ यांच्यासह निर्वाचित सदस्यांचे स्वागत करीत पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी माजी उपसरपंच संदीप महाराज धुमाळ यांनी आभार मानले._*