
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा- सुरेश ज्ञा. दावणे..
मंठा आहे.सध्या रब्बीच्या पिकाचे
वन्यप्राणी शेतात शिरून नुकसान करीत आहेत. त्या पिकाचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात वन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी नवनवीन जुगाड करीत आहेत. आता
शेतात कधी रानडुक्कराचे कळप तर कधी वनगाय(रोही)व हरणाचे कळप तसेच वानराचे खांड नुकसान करीत आहेत. त्यासाठी काहीशेतकऱ्यांनी वानरांना शेतात येऊ नये म्हणून सुतुळी बॉमचा आवाज करीत आहे. रात्रीच्याला मच्छर अगरबत्तीच्या शेवटच्या टोकाला सुतुळी बॉम्ब बांधून देऊन तो पेटून दिल्यावर तो काही वेळेने वाजल्याने हरीन, रोही राणडुक्कर,अन्य वाण्यप्राणी कळप शेतात शिरत नाही ह्या प्रकारे काही शेतकरी टाइम बॉमच जुगाड करीत आहे. तर काही शेतकरी केशकर्तन दुकानात जाऊन मानवी केस आणून शेताच्या धुऱ्यावर जाळत आहेत. त्या जळालेल्या केसांच्या वासाने वन्य प्राणी शेतात शिरत नाही. असा काही शेतकऱ्यांनी प्रयोगही करुन बघितला आहे. बांधावर जाळ करून ठेवणे, बुजगवान उभे करून देणे येवढ करून सुद्धा अनेकदा वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. आता शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. यात शेतकऱ्यांनी गाणे वाजविण्यासाठी किंवा घोषणा देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिकर विकत आणुन त्यात कर्कशपणे भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज रेकॉर्ड करुन रात्रीच्या वेळी सुरु करुन शेतात ठेवून दिले. यामुळे वन्य प्राण्यांना कुत्र्याची भीती वाटते ते त्यांच्यावर हल्ला करु शकतात. या भीतीने वन्य प्राणी शेताजवळ येत नाहीत. बाजारात अनेक छोटे स्पिकर्स कमी किंमतीत..उपलब्ध आहेत. त्यांचा आवाज देखील खूप मोठा असतो. या शिवाय पोर्टेबल लाऊडस्पिकर्स देखील सहज उपलब्ध होतात. त्यामध्ये मेमरी कार्डच्या मदतीने कोणतेही गाणे किंवा अन्य रेकॉर्डींग वाजविण्याची सोय असते. यामध्ये काही शेतकरी स्वतःच्या ओरडण्याचा किंवा बोलण्याचा आवाज रेकॉर्ड करुन ठेवू लागले. आहे. यामुळे चोरांपासून देखील सरंक्षण होत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे हे जुगाड स्वस्त फायद्याचे ठरु शकते.