
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील कळका येथील रहिवासी पेठवडज भाजपा शक्ती केंद्र प्रमुख श्री.व्यंकट लक्ष्मणराव पाटील कळकेकर यांची कंधार तालुका भारतीय जनता पार्टी चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कंधार तालुक्यात पक्ष संघटनेचे कार्य करण्यासाठी आपण प्रयत्नशील होता. आगामी काळात कंधार तालुक्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण परिश्रम घेऊन ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडाल असे कंधार तालुका भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष श्री भगवान राठोड साहेब यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली आहे.तसेच त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी प्रणिताताई देवरे चिखलीकर ,गिरीधारी केंद्रे, गोविंदराव शिंदे सर, असंख्य भाजपा नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.