
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची 192 वी जयंती छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप अहमदपूर यांनी आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी सात वाजता योगा मैदानावर सर्व छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप चा सदस्य आणि सावित्रीची लेक कुमारी प्रियंका बाबुराव चव्हाण एम ए यांनी सावित्रीबाई यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून मनोभावे सद्भावना अर्पण केली. त्यानंतर सोळंके नीता गुलशन एम कॉम कुमारी चव्हाण मोहिनी हनुमान बीएससी आणि कुंदळे शिवलीला मनोज यांनी सुद्धा माता सावित्रीबाई फुले यांना सदिच्छा अर्पण केली.
योगा ग्रुपच्या अध्यक्षासहित सर्व सदस्यांची सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री डी एस वाघमारे यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री डी एस वाघमारे यांनी त्या काळी सावित्रीबाई फुले यांनी किती अवघड प्रसंगाला सामोरे जाऊन मुलीला शिक्षणाची दारे उघडी केली याची उत्तम भूत माहिती दिली.
कुमारी चव्हाण प्रियंका बापूराव एम ए यांनी माता सावित्रीबाई यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आजच्या समाजाला किती मार्गदर्शक आहे आजच्या मोठ्या हुद्द्यावर ज्या महिला गेलेले आहेत ते योगदान सावित्रीबाई फुले यांचाच आहे अशी ही त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.
केवळ एकाच वर्षांमध्ये पुणे शहरांमध्ये आणि परिसरामध्ये मुलींच्या 20 शाळा चालू करून सावित्रीबाईंनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या जोमाने हिमतीने पुढे चालू ठेवला असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन सन्माननीय सदस्य बालाजी दुकाने यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य आणि प्रोगामी प्रबोधनकार संजय महाराज नागपूरने यांनी केले. जयंती महोत्सवास उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित रांची चहापाणी आणि फळांची व्यवस्था छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री पंढरी वाघमारे यांनी केली