दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षा ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात होत्या.त्या परीक्षेचा निकाल दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजी लागला आणि ३ जानेवारी २०२३ रोजी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये राज्य,जिल्हा, व तालुका स्तरावर शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या शहरी व ग्रामीण अशा प्रकारे याद्या प्रसिद्ध झाल्या.
त्यामध्ये सह्याद्री प्रा. व उच्च प्राथमिक शाळा, पारडी या शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी दर्पण धोंडीबा वाघमारे हा जिल्हा गुणवत्ता यादीत २६२ व तालुका गुणवत्ता यादीत ३ ऱ्या क्रमांकावर स्थान मिळवून शिष्यवृत्ती पात्र ठरला आहे.
त्यामुळे त्याचे सह्याद्री शाळेचे संचालक सुदर्शन शिंदे सर व मुख्याध्यापक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्याबरोबरच पिंपळगाव ढगे येथील ग्रामस्थांच्या वतीने दर्पणच्या यशाचे कौतुक केले आहे.


