दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
नॉशनल सायन्स ऑलिप्याड (एसओएफ) च्या वतीने घेण्यात आलेल्या एन.एस.ओ परीक्षेत लोहा येथील ग्लोबल इंग्लिश स्कूल ने घवघवीत यश मिळविले. एकूण 7 सुवर्ण पदक, 7 रजत पदक आणि 8 ताम्र पदक मिळविले. एकूण 22 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी बजावली आहे.
सायन्स ऑलिप्याड फौंडेशन दिल्ली यांचा तर्फे घेण्यात आलेल्या इंटर नॅशनल सायन्स ऑलिप्याड च्या परीक्षे मध्ये ग्लोबल इंग्लिश स्कूल लोहा चे विद्यार्थी मिशकात फातेमा युनुस शेख (वर्ग ३ रा) यांनी यश मिळाले असुन त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे पत्रकार युनूस शेख यांची मुलगी आहे यांना मुख्याध्यापक एन.मनोज कुमार, सौ. हेमा हरी चालीकवार (स्कोलार्शीप परीक्षा इन्चार्ज), कौशल्य रावसाहेब क्षीरसागर, भारत धागे, शैलेश गुरव, शुभांगी मोरे, पूजा धागे, कैलास चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मिळविलेल्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय मोटे पाटील, सचिव डॉ. दिपक मोटे, संचालक दिनेश मोटे, प्राध्यापक संतुकराव वडजे , गटनेते करीमभाई शेख,खलील भाई शेख, नगरसेवक केतन खिल्लारे, पत्रकार मुर्तुजा शेख, जगदीश कदम,फेरोज मन्यार, दत्तात्रय कांबळे,प्रवीण महाबळे, विनोद महाबळे, इमाम लदाफ, शिवाजी पांचाळ, विलास सावळे, दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पा पवार सिकंदर शेख, यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.


