
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
कंधार – कंधार तालुक्यात सर्वश्रुत असणारे व दांडगा जनसंपर्क असणारे लोकांचे हित जपणारे आदरणीय विजय पाटील कल्याणकर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे .असे पत्र भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
विजय रामजी पाटील कल्याणकर हे अतिशय शांत आणि मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडील हे सुद्धा नामांकित व्यक्तिमत्व होते. त्यांचाच वारसा पुढे चालवण्यासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व आजूबाजूतील समस्या सोडविण्यासाठी त्यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल राजकुमार चिंचोले, विठ्ठल चिंचोले, बालाजी कल्याणकर, नामदेव कल्याणकर, सरपंच भीमराव पाटील, मारुती पाटील, माधवराव पाटील, व्यंकटराव मुसांडे,माधवराव रामजी पाटील, दत्तात्रय पाटील, बाबुराव सांगावे, किशन कल्याणकर ,दादाराव पाटील, जयवंतराव चिंचोले,सतीश चिंचोले, बालाजी कारभारी राहुल सोनकांबळे धोंडीबा सोनकांबळे, माणिकराव बेळकोने गंगाधर गवारे गोविंद सावकार मारुती आरळे, संजय आरळे, भास्कर सोनकांबळे भीमराव सोनकांबळे व गावातील इतर मान्यवर पत्रकार प्रतिष्ठित मंडळी नातेवाईक शिक्षक व इतर कर्मचारी यांनी सुद्धा त्यांचे मनापासून त्यांच्या या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.