
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
ज्ञानाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.श्री शिवशंकर मा वि.वन्नाळी येथे माता सावित्रीमाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करणायत आली.5 वी ते 10 वी वर्गातील मुला मुली सावित्रीमाई च्या वेशभुषेत आल्या होत्या.सावित्रीमाई यांच्या जीवनचरित्रवर गीतं व सुंदर अशी भाषण केली. कु. भक्ती हिप्परगे हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मु अ श्री वनंजे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक श्री पेटेकर सर,यावेळी मुख्याध्यापक सुरेश वनंजे सर बालाजी पेटेकर यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर वैचारीक मनोगत मांडले.श्री पाटील सर, श्री बामणे सर, श्री खिस्से सर, श्री कदम सर, श्री दिमलवाड सर श्री वाघमारे सर श्री बारडवर सर, सौ देशमुख मॅडम, पाटील सर, अंकमवार मामा उपस्थित होते. आभार कु.भाले हिने मानले.यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यी उपस्थितीत होते.