
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर शहरातील सप्तगिरी पोदार लर्न स्कूल देगलूर, शाळेतील विद्यार्थीनी काव्या संजय इंगळे 87.2483 टक्के घेऊन ही शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये राज्यातून 11 वा क्रमांक पटकविलेला आहे. तसेच डॉ. होमी भाभा परीक्षेत अर्णव ऋषीकेश बरडे 68, काव्या संजय इंगळे 68 व अथर्व बालाजी बोधनकर 60 गुण घेऊन यांची प्रात्यक्षीक परिक्षा (Practical) साठी निवड झालेली आहे तर श्रावणी दत्ताजी पांचारे, अखिलेश सुरेश चप्पलवार, प्रितम सुधाकर बोडके, प्रणिल अनिल दुगाणे, अपूर्वा बालाजी चेवले, रूद्र सचीन मुंडकर, आरूष अनंत कुलकर्णी, आरूष संजय देशमुख, राजवर्धन हेमंत राजुरकर, वात्सल्या विजयकुमार जंपला, हर्षवर्धन हरीभाऊ घुमे आणि सोहम शषीकांत गरुडकर इत्यादी विद्यार्थी है प्रमाणपत्रासाठी पात्र झाले आहेत.
विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापवार सर, उपाध्यक्ष डॉ. जवळगेकर सर, डॉ. भूरे सर, डॉ. एकलोर सर, डॉ. मिसाळे सर, डॉ. घोडके सर, डॉ. मसलगेकर सर व शाळेचे प्राचार्य श्री शेकापूरे सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतूक करून त्यांना शुभेच्छा दिल्या व विषय शिक्षकांचे अभिनंदन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतूक पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.