
दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी
उत्तर महाराष्ट्रातील वयाच्या साठीत बहूचर्चित गावकुसाचे ग्रामिण लेखक कवी संपादक गावगाडाकार श्री साहेबराव नंदन ताहाराबादकर नाशिक निवासी यांचा बहुचर्चित अस्सल ग्रामिण बाज असलेला॥ गावगाडा ॥ काव्यसंग्रहास महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती यांचा बहुमानाचा राज्यस्तरीय साहित्य क्रांती २०२३ हा पुरस्कार जाहिर झाला असून १५जानेवारी ला विविध शासकिय लोक प्रतिनिधी साहित्यिक यांच्या उपस्थितीत मुंबईतील बोरिवली येथे खुले काव्य संमेलनात पुरस्कार प्रदाण करण्यात येणार असल्याची माहीती संघटनेच्या आयोजक कवयित्री सौ . आशाताई ब्राम्हणे यांनी दिली . लेखक, समाजसेवक प्रबोधनकार श्री साहेबराव नंदन यांच्या साहित्य कलेला अनेक मान सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . साहित्य क्षेत्रात ऑन लाईन ३०० च्या पुढे सन्मान पत्र व ऑफ लाईन व्यासपिठावर अणेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत . त्यांच्या ह्या यशाच्या गगन भरारीस पुष्प रत्न समुहाचे प्रमूख प्रा . डॉ . आनंद आहिरे नाशिक सगर रत्न परिवाराचे प्रा . डी . टी . पाटील पिंपळनेर अँड बापूसाहेब संभाजीराव पगारे धुळे ‘संपादक ललितकुमार साळवे ‘अशोक पाटील नाशिक .हेमंतभाऊ पगारे आर के पाटील प्रकाश आधव राजेंद्र साळवे मुंबई ‘ विडंबनकार कवी संजय आहिरे कवी सुभाष उमरकर नाशिक पत्रकार सुभाष जगताप ‘राजेंद्र गवळी .सौ . पुष्पलता पगारे पिंपळनेर परखड न्यूज चे संपादक राजेष आंधळे तान्हाजी खोडे नाशिक तसेच कवीवर्य संपादक कवी सरकार या सह अनेक मान्यवरांनी आनंद व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या आहेत . सदरच्या पुरस्काराने सगर रत्न परिवारात आनंदाचे वातावरण आहे .