
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील वसमत महामार्गावरील श्रीक्षेत्र दत्तधाम मंदीर प्रांगणात श्री गुरुचरित्र कथामृत व कीर्तन सप्ताह कालीन यागासाठी नियोजित यज्ञ भूमीचे उद्घाटन आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त श्री अखंड सद्गुरू सेवा संघ व श्रीक्षेत्र दत्तधाम, कारेगाव, परभणी यांच्या संयुक्त पुढाकाराने कीर्तन महोत्सव, एक हजार श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, श्री दत्त याग, श्री गुरुचरित्र कथामृत व कीर्तन सप्ताहाचा प्रारंभ ७ जानेवारीला तर १४ जानेवारीला महाप्रसादाने भव्य अशी सांगता केली जाणार आहे. या दरम्यानच्या कालावधीत
काकड आरती, महाभिषेकम्, आरती, त्रीपदी, श्री दत्त याग, श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, नैवेद्य आरती, महाप्रसाद, हरिपाठ, नामवंत कीर्तनकारांची कीर्तने असे विविध धार्मिक उपक्रम राबविले जाणार आहेत. याच सप्ताह कालीन यागासाठी नियोजित यज्ञ भूमीचे उद्घाटन स्थानिक शिवसेना आमदार राहूल पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधी व शोडशोपचारे पध्दतीने संपन्न झाले.
या प्रसंगी प. पूजनीय मकरंद महाराज, वेळ.शा.स. नित्रुडकर गुरुजी, वेळ.शा.स. प्रल्हाद गुरुजी मुळे, वे.शा.स. संजूभाऊ, खारेगाव नगरीचे सरपंच आप्पाराव लावले, उपसरपंच शिवकुमार अवचार, माजी सरपंच बालाजी लिंगायत, सदाशिव अवचार, राजू वावरे, राजाराम वावरे, नवनाथ अवचार, अर्जून अवचार, शालिकराम अवचार, काशिनाथ अवचार, सुरेन्द्र जोशी, शंतनू पांडे, मुकुंद महाराज, अनंतराव देशमुख, मारुती तीथे, बाबू फुलपगार, उद्धवराव मोहिते, ऋषिकेश सावंत, मकरंद कुलकर्णी, परिवार व अनेक भाविक भक्त उपस्थित होते.