
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी आठवडी बाजार येथे नगर परिषदेचे शॉपिंग सेंटर आहे हे शॉपिंग सेंटर नगर परिषदेने भाडे तत्वावर चालविण्यास दिले आहे.गेल्या एक वर्षापासून या शॉपिंग सेंटर समोर अनधिकृतपणे चिल्लर मांस,मच्छी विक्रीची दुकाने लागली आहे तसेच फासे पारधी भटक्या जमातीच्या काही लोकांनी येथील दुकानासमोर अतिक्रमण केले आहे त्यामुळे त्यांचा अतिरेक वाढला असून या दुकानामुळे या ठिकाणी रोज काही ना काही अनुचित प्रकार घडत असतो.अशा प्रकारामुळे प्रतिष्ठित ग्राहक दुकानावर येण्यास टाळाटाळ करतो या सर्व गोष्टींचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे.येथील अनधिकृरीत्या थाटलेली मांस मच्छी ची दुकाने या ठिकाणावरून हटविण्यात यावी तसेच फासे पारधी लोकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी आज नगर परिषद मार्केट मधील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देवून मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी जनसेवा कृषी सेवा केंद्र,होटल जीवदानी, तलोकर काटा दुरुस्ती केंद्र,धरती कॉम्प्युटर,कृष्णा जेंट्स,स्वस्तिक प्लायवूड,शेकोकार बिज भांडार योगीराज जेंट्स पार्लर,जय गुरुदत्त वर्कशॉप,जय लक्ष्मी हॉटेल,जय गुरुदत्त ऑटोमोबाईल्स तसेच मार्केट मधील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.