
दैनिक चालु वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
पेठवडज :- पेठवडज येथील तलावात मासे पकडत असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन सुरेश नामदेव पंदीलवाड वय वर्षे ३५ यांच्या मृत्यू झाला असून ही घटना त्यांच्या सोबत मासेमारी करणाऱ्या लोकांनी बघितलेली आहे.तलावात मासे पकडत असताना अचानक सुरेश पंदिलवाड यांच्या छातीमध्ये दुखू लागले आणि अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते मृत्यूमुखी पडले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पेठवडज बिटचे पो.हेड काॅ.श्री.जुने साहेब व श्री.व्यवहारे साहेब यांनी पंचनामा केला असून कंधार पोलिस स्टेशनचे पि.एस.आय.श्री.इंद्राळे साहेब व त्यांच्या टिमने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.