
दैनिक चालु वार्ता मोताळा प्रतिनिधी:-
समता संघटनेची छोटेखानी बैठकीचे आयोजन दि.२ जानेवारी रोजी मोताळा येथे करण्यात आले होते. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गायराण जमिनीवरील अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असुन अतिक्रमण धारकांना प्रश्नांसाठी आपला लढा सुरूच ठेवू असे प्रतिपादन समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितिनभाऊ गवई यांनी सांगितले. यामध्ये वर्तमान पत्राद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र सोशल मिडिया प्रमुख पदी गणेश वाघ यांची तर जिल्हा महासचिवपदी दिलीप गायकवाड यांनी आंदोलनात्मक भुमिका ठेवून आदिवासी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्पर राहून संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे, मोताळा तालुकाध्यक्षपदी विजय बावस्कर यांनी सुध्दा संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे, तसेच जनतेचे विविध प्रश्न सोडावे व चांगल्या प्रकारे काम करावे. यावेळी समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, नितिनभाऊ गवई, जिल्हाध्यक्ष विजय दोडे, समाधान अवचार, गजानन जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.