
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
(अतिक्रमण धारकांना दिलेल्या नोटीस विरोधात)
अर्धापूर शहरातील विविध भागात मागील पन्नास वर्षापासून वास्तव्यात असलेल्या गरीबाना अतिक्रमण काढण्यासाठी देण्यात आलेल्या नोटिसांच्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध करत बुधवारी तहसील वर भव्य मोर्चा काढून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना तात्काळ कायम करावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मागील काही दिवसापूर्वी महसूल प्रशासन आणि नगरपंचायतीच्या वतीने शहरातील विविध भागात पन्नास वर्षापासून वास्तव्य असलेल्या नागरिकांना आपले अतिक्रमण काढण्यात येईल अशा नोटीस प्रशासनाने बजावल्या या नोटिसामुळे गरीब कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . या कुटुंबाला आधार देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी धाऊन आली आहे. शासनाच्या या धोरणा विरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध केला असून बुधवारी अर्धापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे.या मोर्चामध्ये हाजारो नागरिक सहभागी झाले होते.मोर्चेकर्यानीं तिव्र घोषणाबाजी करत मोर्चा काढून शासनाने तात्काळ या नोटीस रद्द करून अनेक वर्षापासून वास्तविक असलेल्या गरीब कुटुंबांना कायम करावे अशी मागणी केली. नागरिक अनेक वर्षापासून वास्तव्यात आहेत जर यांना कायम नाही केले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता फारुख अहमद संघरत्न खंदारे वंचित तालुका अध्यक्ष विनय मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निरंजना आवटे, तालुका कार्याध्यक्ष शेख शकील मेंबर संघटक दीपक मगर,आलीम दादा, शहराध्यक्ष शेख शाकेर,शहर महासचिव संदेश खंदारे, राजाराम सरोदे, केके कांबळे गोपाळ सीतळे विलास गोल्हेर,सुरेश सावते सतीश ढवळे, संतोष डोंगरे, अशोक जाधव,