
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता.देगलूर ची विद्यार्थिनी कु.प्रियंका विजय बामणे ही इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी “मोबाईल चिंता आणि चिंतन” या सोशल मिडियाच्या विषयावर सुंदर व अभ्यासपुर्ण मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.आजकाल मोबाईल च्या अति वापरामुळे बिघडत चाललेल्या युवा पिढीला विचार करायला लावणारे वक्तृत्व मनाला भावनारे होते.तिच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी मंत्री मा.भास्करराव पाटील खतगावकर,साई शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब पाटील खतगावकर यांनी तिचे विशेष कौतुक केले. तिच्या या उत्कृष्ट भाषणाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.ती परभणीच्या बाल विद्या मंदिर हायस्कुल आयोजित कै.म.शं.शिवनकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या उत्कृष्ट वक्तृवानी विशेष छाप टाकली.तिच्या यशस्वीतेसाठी तिचे मार्गदर्शक,कलाध्यापक,बालाजी पेटेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक,सुरेश वनंजे,राजेश बामणे,आनंद दिमलवाड,धनाजी पा. मोरे,माधव कदम,दिगंबर खिसे,कलाध्यापक बालाजी पेटेकर,सौ अंजली देशमुख,श्री बालाजी बारडवार,दिलीप पाटील व अंकमवार मामा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक केले.तिच्या यशाबद्दल वनाळी व वनाळी परिसरातील पालकातून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.