
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी :आज देगलूर येथे पत्रकार दिनानिमित्त देगलूर पोलीस स्टेशन येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक अद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व देगलूर व देगलूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचे देगलूर पोलीस स्टेशन तर्फे सत्कार करण्यात आला व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी देगलूर पोलीस स्टेशनचे पी आय सोहम माछरे यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले व पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर काही पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी देगलूर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव व सर्व पोलीस कर्मचारी
कार्यक्रमाला उपस्थित होते