
दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी *दर्पण दिन* म्हणून पत्रकार दीन आज काटकळंबा ता कंधार येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने साजरा करण्यात आला.
आपल्या जिल्ह्याचे खासदार *श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष *किशोर भाऊ देशमुख* यांच्या सुचनेनुसार कंधार भाजपा युवा मोर्चाच्या वतीने श्री शंकरराव जाधव श्री राजेश पावडे श्री रुक्माजी कोल्हे श्री प्रभाकर पांडे श्री आनंद पांचाळ श्री संघपाल वाघमारे श्री दिगंबर तेलंगे या सर्व पत्रकारांचा सन्मान व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष साईनाथ अप्पा कोळगीरे, उपाध्यक्ष महेश वाघमारे ,सरचिटणीस गोविंदराव पाटील वाकोरे, अल्पसंख्याक उपाध्यक्ष नवाज सय्यद, शिवराज स्वामी, गंगाराम बस्वदे, माधवराव ऐकाळे, माधवराव चोंडे,समद सय्यद, बालासाहेब शिंदगे, कमलाकर वाघमारे, शिवाजी टोकलवाड, महेबुब पठाण, सचिन हांबर्डे,अदी कार्यक्रर्ते उपस्थित होते.