
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
क्षेत्र कुठलेही असो त्यात यश संपन्न करायच असेल तर , सातत्यपुर्ण प्रयत्न व सुरुवात महत्वाची असते , बळीरामपूर ता. जि. नांदेड या छोट्याश्या गावातील एक धडपडणारा युवक म्हणजे
पृथ्वी संघपाल भंडारे (७५२२९५४०३७) हा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा साधारण विद्यार्थी. पृथ्वी ला ७ वी पासूनच बॅनर बनविण्याचा छंद होता.
आज पृथ्वी ने पृथ्वी ग्राफीक्स नावाने नवा डिजिटलं व्यवसाय सुरु केला आहे. व पृथ्वी हा नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध ग्राफीक्स डिझाईनर आहे. वाढदिवस , विविध कार्यक्रम , व्हिजिटिंग कार्ड , इलेक्शन बॅनर इ. सुंदर प्रकारचे डिझाईन बनविणे आत्मसात केले.पृथ्वीचे काम आज घडीला नांदेड पुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची ओळख त्याच्या कामातून झाली आहे.प्रामुख्याने पुणे आणि मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा त्याच्या कामाची दखल घेतली आहे.
विशेष म्हणजे पृथ्वी ने कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नाही. आजच्या युगात बेरोजगारी ही आपली मोठी समस्या बनली आहे. या डिजिटल युगामध्ये पृथ्वी ने निवडलेली ही वाट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सुरुवातीला आपल्या स्मार्ट फोन मध्ये काम करणारा पृथ्वी आता कॉम्प्युटर वर काम करू लागला आहे . पृथ्वी ही कामे ग्राहकांसाठी सोईस्कर होईल अश्या कमी दरात करत , असल्याचे तो सांगतो , पृथ्वी च्या नावीन्यता असलेल्या कल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत मी या व्यवसायामुळे मी खूप नव नवीन मित्र कमविले. अस तो सांगतो त्यात मला माझ्या आई वडिलांचे खूप सहकार्य आहे. मला वेळोवेळी प्रा. सचिन कदम सर ( पुणे ) नांदेडभुषण प्रा. नितीन दारमोड सर , प्रीतम भैया जोंधळे , दिलीपदादा गजभारे ,रवींद्र भंडारे , गौतम भंडारे ,पंकज भंडारे ,राजू गजभारे ( वाजेगाव ) श्रीधर वाघमारे , सुनील धुतराज , बाली कांबळे इ. यांच मार्गदर्शन लाभल्याचे पृथ्वी ने सांगितले , पृथ्वी ला खूप खूप शुभेच्छा..!!पृथ्वी ची अशी इच्छा आहे की समाजातील मुलांनी नौकरी च्या मागे न लागता स्वतः चा व्यवसाय सुरु करावा. भविष्यात जे नवीन ग्राफिक्स डिझाईनर येणार आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचा त्याचा मानस आहे.