
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे, दि. ६: येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे २४X७ सुरू असणारी ऑनलाईन टेलीमानस १४४१६ ही टोलमुक्त सेवा सुरु करण्यात आली असून गरजुंनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टेलीमानस सेवेअंतर्गत चिंता, तणाव, नैराश्य, नातेसंबंधातील दुरावा, कामाचा ताणतणाव, चिडचिडपणा, एकटेपणा, वर्तवणूकीतील बदल, निद्रानाश, अतिविचार, उदासिनपणा, व्यसनाधिनता आदी प्रकारच्या मानसिक समस्या समजून घेत त्यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
टेलीमानस च्या १४४१६ या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर मानसिक आरोग्य सुविधा प्रदान करण्यासह केवळ समुपदेशन न करता मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला व पाठपुरावा सेवा आणि वैयक्तिक सेवांशी जोडून दिले जाते. या सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर संबंधितांनी निवडलेल्या भाषेत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक यांनी दिली आहे.