
दैनिक चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
. . नांदेड शहरात आज वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस मराठी पत्रकारिता दिवस तथा दर्पण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. . . त्याच अनुषंगाने श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर व नवीन कौठा नांदेड मध्ये सुद्धा दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस कॉलेजचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड , माध्यमिकचे पर्यवेक्षक शिवराज पवळे प्राथमिकचे पर्यवेक्षक पंढरीनाथ काळे तसेच ज्येष्ठ प्रा. सय्यद जमील व प्रा.वसंत राठोड तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. . . या प्रसंगी कार्यक्रमात दैनिक चालू वार्ता चे उत्तर नांदेड चे प्रतिनिधी श्री समर्थ दादाराव लोखंडे यांनी दैनिक चालू वार्ता च्या माध्यमातून उत्कृष्ट पत्रकारिता केल्यामुळे त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल व माध्यमिकचे पर्यवेक्षक श्री शिवराज पवळे त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवामुळे व उत्कृष्ट पत्रकारिते बद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुधीर भाऊ गुरुनाथराव कुरुडे सर यांच्या शुभहस्ते शाल , श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. . . तसेच दैनिक चालू वार्ताचे नांदेड प्रतिनिधी प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव व उत्तर नांदेड चे प्रतिनिधी श्री समर्थ दादाराव लोखंडे यांच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता करत असताना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी उत्कृष्ट पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अन्याय , अत्याचार व विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम तथा सामाजिक , राजकीय , शैक्षणिक विषयाला हात घालून समाज उन्नतीचे कार्य हाती घेतल्यामुळे कॉलेजचे प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे तथा उप प्राचार्य परशुराम येसलवाड माध्यमिकचे पर्यवेक्षक श्री शिवराज पवळे , प्राथमिक पर्यवेक्षक श्री पंढरीनाथ काळे व ज्येष्ठ प्रा. सय्यद जमील या मान्यवराच्या हस्ते दर्पण दिनाचे औचित्य साधून वरील पत्रकारांचा हृदयपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रसंगी या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक बंधू व भगिनी तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. दीपा जामकर यांनी केले.