
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सीनियर गट पुरुष व महिलाच्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत यजमान जळगाव मनपा पुरुष संघाने पुणे जिल्हा पुरुष संघावर बारा शून्य होम रनांनी एकतर्फी विजय संपादन केला. महिला गटात पुणे जिल्हा महिलांनी जळगाव मनपा महिला संघावर अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या क्षणी रोमहर्षक विजय मिळविला. तर पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात अमरावती संघाने अहमदनगर संघावर विजय प्राप्त करीत तिसरा क्रमांक मिळविला. महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कोल्हापूर जिल्ह्याने पुणे मनपावर विजय प्राप्त करीत तिसरा क्रमांक पटकाविला.विजयी संघातील खेळाडूंना पी.ई.तात्या पाटील (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटना),डॉ.अस्मिता पाटील,श्री.मनोज पाटील (माजी अध्यक्ष ग.स.सोसायटी) क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित, श्री दीनानाथ भामरे (म.न.पा. क्रीडा अधिकारी) शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.प्रदीप तळवेलकर (सचिव महाराष्ट्र राज्य सॉफ्ट बॉल संघटना) डी डी पाटील, एन डी पखाले, (सहसचिव महाराष्ट्र राज्य सॉफ्ट बॉल) दीपक सोनटक्के (सहसचिव महाराष्ट्र राज्य सॉफ्ट बॉल) श्री .रमाकांत बनसोडे,श्री प्रशांतजगताप( महाराष्ट्र राज्य साॅप्टबाॅल) श्री. मुकुंद देशपांडे ( टेक्निकल कमिटी प्रमुख),लेखराज उपाध्याय ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत विजयी संघांना बक्षीस वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा सन २०२३-२३ अंतिम निकाल पुरुष गटामधून
१) जळगाव मनपा (प्रथम) २) पुणे जिल्हा (द्वितीय) ३) अमरावती जिल्हा (तृतीय)
तर महिला गटामध्ये १) पुणे जिल्हा (प्रथम) २)जळगाव मनपा (द्वितीय) ३) कोल्हापूर जिल्हा (तृतीय)
स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे श्री.मार्क धर्माई (तालुका क्रीडा अधिकारी मुक्ताईनगर),श्री.जगदीश चौधरी (तालुका क्रीडा अधिकारी चाळीसगाव),श्री.गुरुदत्त चव्हाण (तालुका क्रीडा अधिकारी एरंडोल),श्री.एम.के.पाटील (क्रीडा अधिकारी),सौ.सुजाता गुल्हाने (क्रीडा अधिकारी),श्री.राजेंद्र चव्हाण,श्री.मीनल थोरात (क्रीडा मार्गदर्शक),श्री.अरविंद खांडेकर (क्रीडा मार्गदर्शन) तसेच जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे मिलिंद तळेले,अरुण श्रीखंडे,शंकर मोरे,प्रा.संजय चौधरी,श्री.अनिल माकडे,आकाश सराफ,देविदास महाजन,विजय विसपुते,देवानंद सोनार,विद्या कलंत्री,सौ.मनिषा देशमुख,सौ.छाया पाटील,महेंद्र सोनगिरे सुमित गाडे,अनिकेत जाधव,अनिकेत पाटील,मोहित चौधरी,गणेश पाटील,सागर साळुंखे, सुशांत पाटील यांचे सहकार्य लाभले.