
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित आज दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी स्वर्गवासी दादासाहेब हावरे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर,आदिवासी लोकांना ब्लँकेट वाटप व स्व.सतीश हावरे यांनी देणगी स्वरूपात दिलेल्या रकमेतून घेतलेल्या जागेचा लोकार्पण सोहळा यावेळी करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुधाकरराव हावरे तर प्रमुख अतिथी प.पू.आचार्य जितेंद्रनाथ महाराज श्रीनाथ पिठाधीश्वर देवनाथ मठ,खासदार अनिल बोंडे,भाजप जिल्हाध्यक्ष निवेदीताताई दीघडे,हावरे ग्रुपचे डायरेक्टर प्रवीणजी हावरे,सौ.नंदाताई राऊत (ग्रा.पं.सरपंच पथ्रोट),श्री.दादासाहेब काळमेघ (अध्यक्ष जयसिंग महाराज संस्थान),श्री.नारायणराव इंगळे (प्राचार्य जयसिंग विद्यालय),श्री.जानरावजी हागे (सामाजिक कार्यकर्ते),श्री.अतुलजी वाठ (उपसरपंच ग्रा.पं.पथ्रोट),श्री.नितीनजी गोरले (पोलीस पाटील पथ्रोट)तर अनिल हावरे (सचिव,दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट),सौ.विजयाताई भांगे (कोषाध्यक्ष,दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट),राजेंद्र हावरे (सहसचिव,दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट),सुरेश हावरे (सदस्य,दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट),संजय हावरे (सदस्य,दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट),उज्वलाताई हावरे (सदस्य,दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट),रवींद्र यावतकर (सदस्य,दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट),धर्मेंद्र हावरे (सदस्य,दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट) तसेच दादासाहेब हावरे चॅरिटेबल ट्रस्ट चे व्यवस्थापक मंडळ तसेच तालुक्यातील भाजप कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.