
दैनिक चालू वार्ता अहमद्पुर प्रतिनिधि- विष्णू पोले
काल परवा झालेला विजकर्मचाऱ्यांचा खाजगीकरणाच्या विरोधातील संप,त्यामुळे झालेले सर्व सामान्यांचे हाल आणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संप मिटवण्यात आलेलं यश या सर्वात गोंधळलाय तो सर्व सामान्य माणूस त्याला समजलंच नाही नेमक खाजगीकरण म्हणजे काय आणी ते शाप आहे की वरदान.
खाजगीकरण:देशाच्या स्वतंत्र्यानंतर भारताने पूर्ण जगाच्या अर्थकारण, समाजकारण,व्यापारीकरण,सेवा,उपभोग या सर्वांचा विचार करून विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला पण 1991साला पासून मुक्त अर्थव्यवस्थेला सुरुवात झाली.सरकारी,सार्वजनिक कंपन्या जेव्हा सरकार नफ्यात चालवू शकत नाही किंवा सेवा देऊ शकत तेंव्हा खाजगी मालकांना विकल्या जातात किंवा काही कराराने चालवायला दिल्या जातात त्याला खाजगीकरण म्हणतात.स्व.इंदीरा गांधी यांनी बँकांना राष्टीयकृत केल आणी बँका आणी उलाढाल झपाट्यान वाढली,तसेच अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बाल्को,इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन आदी सारख्या कंपन्याच खाजगी करण केल आणी त्यांच्या या धाडसच कौतुक पण झाल.
पण सध्या २०१४,आणी २०१९ मध्ये नरेंद्रमोदी यांच्या नेतृत्वात आलेल्या मोदी सरकारच्या काळात खाजगीकरण हा मुद्दा खूप गाजतोय.
खाजगीकरण हे हितकर पण आहे पण आपण म्हणजेच आपला आपला ग्राहक त्या कुवतीचा हवा नाहीतर त्या त्या व्यक्तीवर आपण काहीतरी लाद्नार् असू तर ते हितवाह्य होणार नाही.सरकारी कंपन्या मध्ये सर्व स्तरावर विचार केला जातो तसा विचार खाजगी करण झाल्या नंतर होत नाही.खाजगीकरणात नफ्यावर खूप भर दिला जातो ,त्याची किंमत,त्याचा मोबदला या सर्व गोष्टी येतात पण सार्वजनिक क्षेत्रात समाजिक ,आर्थिक या गोष्टीवर भर दिला जातो.खाजगीकारणामुळे आपल्याला सेवा चांगली मिळू शकते यात काहीच शंका नाही.पण आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या इथे गरीब,माध्यमवर्गीय,श्रीमंत अशा प्रकारच्या आर्थिक रेषा आहेत.मग ज्यांच्या जवळ पैसा आहे तेच त्या गोष्टींचा उपभोग घेतील दुसऱ्यांनी काय करायच मग सामाजिक विषमता निर्माण होईल.खाजगीकारणामुळे आपण प्रगतीकरू यात काहीच दुमत नाही पण त्या साठी आपल्याला सर्वात अगोदर आपली जनता आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे का याचा विचार करावा लागेल.कालच्याच संपातून एक गोस्ट शिकण्यासारखी होती ज्यांची आर्थिक स्तिथी चांगली होती त्यांना काही वेळ तरी इन्व्हर्टर म्हणा दुसरी साधन या मूळे काही प्रॉब्लेम नाही झाला पण ज्यांच्या कड हे उपलब्ध नाही त्यानचे हालच झाले.
खाजगी कारणामुळे उपभोग्य वस्तुच्या किंमती मालक ठरवतील ते सामाजिक भान ठेऊन तर नाही ठरवणार ते आपला फायदा बघतील स्वतःचा (सर्व सामान्यासाठी रेल्वेचा कमी दराचा प्रवास खाजगीकरणा नंतर वाढेल सामान्य माणूस भरडला जाईल) खाजगीकरण झाले तर सरकारी नोकऱ्या संपुष्टात येतील त्यामुळे बेरोजगारी वाढेल. खाजगीकरणा मुळे विकास होईल पण सर्व समावेशक होईल याची शास्वती नाही.सरकार खाजगीकारणावर नियन्त्रण ठेऊ शकणार नाही फक्त आपली निर्देशक म्हणूंन भूमिका असेल त्यामुळे आपण आपली अर्थव्यवस्था भांडवल शाही कडे जाताना बघू आपल्या जवळ काहीच उरणार नाही आणी व्यापारी म्हणून आले आणी राज्यकर्ते झाले हा आपला इतिहास विसरून आपण आपली वाटचाल करणार असाल तर हे देशासाठी घातक आहे.राजकारणी काही व्यापाऱ्यना राज्यकरीते बनू देणार नाहीत पण सामान्य जनता मात्र भरडून जाईल.देशाच्या मूलभूत बांबीवर जर खाजगीकरण लाद्दल गेल तर देशात सद्या असलेली सर्वसमावेशक भावना राहणार नाही.खाजगीकरण हे वस्तू,सेवा,रास्त किंमत ,वस्तूचा दर्जा योग्य देऊशकते,सहकार आणी खाजगी क्षेत्रात रोजगार निर्मित करूशकते,सरकारला आर्थिक,व्यवसायिक गोष्टीवरचे लक्ष कमी करून सामाजिक बांबीवर लक्ष देता येते.हे सर्व खर आहे पण जे देश विकसनशील होते आणी त्यांनी खाजगी करणाचा स्वीकार केला तो प्रत्येक देश अधोगतीकडे गेला हा इतिहास आहे.आम्हांला काही क्षेत्रात खाजगीकरण असावं अस वाटत पण आपल्या मूलभूत गरजा असणाऱ्या क्षेत्रात नको व्यहाला .शेवटी खाजगीकरण शाप की वरदान अनुतरीत प्रश्न.राजकीय पुढारी,शासन,प्रशासन आणी देशातील उच्च विद्याविभूषित अर्थतज्ञ् यांच्या कोर्टात आपला चेंडू .