
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या १२८ विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सह्याद्री रांगेतील सर्वोच्च शिखर(१६४६ मीटर उंच) या ठिकाणावर पोहोचून वंदे मातरम म्हणून भारत मातेचा जयघोष करत आनंद व्यक्त केला.
दिनांक १ जानेवारी ते ६ जानेवारी २०२३ वर्ग सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नर्मदा ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून सदन व्याली, भंडारदरा डॅम, कळसुबाई शिखर, ब्रह्मगिरी पर्वत, अकलूज या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रात्री टेंट मध्ये राहणे निसर्गाच्या
सानिध्यात राहून निरीक्षण करणे असा सगळा अनुभव मुलांनी घेतला. ग्लोबल नॉलेजच्या ७ विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षाच्या कोविड द्व नंतर यावर्षी सहलीचा आनंद घेतला. पश्चिम क घाटातील पर्यटकांचे व गिर्यारोहकाचे दि . आवडीचे ठिकाण सदन व्हॅली, जमिनीला प्रस्तरभंग होऊन पडलेली एक मोठी दरी जो निसर्गाचा एक चमत्कारच मुलांनी तेथे राम्प्लिंग साह्याने हळुवारपणे मोठ्या मोठ्या पाषाणावर उतरून पाण्यात आनंद घेतला.सहलीसोबत शाळेची मॅनेजिंग डायरेक्ट सुयश बिरादार व सुजित बिरादार, व्यवस्थापक रामेश्वर सगरे, ज्ञानेश्वर त भामरे, विठ्ठल गुरमे, कांबळे विशाल, अनिता दि स्वामी,स्वप्नाली पाटील, प्रशांत सुतार, गारुळे क सुरज हे सर्व शिक्षक व नर्मदा ट्रॅव्हल्स चे दि नरेंद्र स्वामी यांनी सर्व ठिकाणी मुलांची वि काळजी घेतली. सहल यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बिरादार यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.