
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील पेठवडज येथील धरणाच्या कालव्याचे काम अतिशय उत्तम रित्या केले आहे आणि शेतकऱ्यांना मूबलक प्रमाणात पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार आहे.त्यामूळे शेतकऱ्यांनी शासनाचे व पाटबंधारे विभागाचे जाहीर आभार मानले आहेत आणि तसेच दैनिक चालू वार्ता ने वेळोवेळी बातमी लावून सरकारच्या व लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आणून दिले त्यामुळे दैनिक चालू वार्ता पेपर चा सिंहांचा वाटा आहे.आणि सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती त्यांच्या मागणीला यश आले असून त्यांचे असे म्हणणे आहे की बिगर परवानगी कनेक्शन देण्यात आले आहेत त्यामुळे परवाना धारक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.त्यामुळे अनधिकृत कलेक्शन बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.तसेच पेठवडज सर्कल मधील सर्व शेतकरी बांधवांनी दैनिक चालू वार्ता पेपर चे मुख्य संपादक श्री.डि.एस.लोखंडे पाटील साहेब यांचे जाहीर आभार मानले आहेत.वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बातम्या प्रकाशित करून सरकार दरबारी त्याची नोंद करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून बोलून काम करायला भाग पाडतात.