
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:आज रोजी “महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे” अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील पुजा पब्लिक स्कुल व मानव्य विकास विद्यालय येथील विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना व एन सी सी कडेट्सना यांना देगलूर पोलीस स्टेशनमध्ये बोलावून पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते व कुठली शस्त्रास्त्रे कशी वापरतात पोलीस स्टेशनचे कोणकोणते कार्य आहे व कायद्यांची माहिती याबाबत देगलूर पोलीस स्टेशनचे पी आय सोहम माछरे यांनी सव्वीस्तर मार्गदर्शन केले व देगलूर शहरातील विविध शाळेमधील विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहेत व पोलीस मुख्याल येथून आलेल्या बँडपथकास शहरातील महत्वाच्या ठिकाणी वाजवण्यात आले व जनजागृती करण्यात आले
त्यावेळी देगलूर शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आधीच उपस्थित होते.