
दैनिक चालू वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी- शितल रमेश पंडोरे
————————————————–
*संभाजीनगर* :- हदगाव तालुक्यातील हस्तरा येथील बापुराव कदम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले , त्यांच्या दहाव्या च्या कार्यक्रमाच्या दिवशी च त्यांची आई गंगाबाई कदम यांचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे . ह्स्तरा येथील बापुराव कदम हे भूमीहीन असून त्यांना दोन मुली अन दोन मुल या पैकी दोन मुल मतीमंद आहेत . घरात अठरा विश्व दारीद्र बापुराव कदम यांचे वय झाल्याने त्यांना काही काम करता येत नव्हते ते दोन मतीमंद मुलांना दिवसभर सांभाळायचे तर त्यांची पत्नी मजुरीला जाऊन कसा तरी संचार चालावायची . कधी फोडणीला तेल नाही तर कधी चहा ला साखर नाही अशा प्रतिकुल परीस्थितीत संसार चालू होता . घरात खाण्याची आभाळ होत असल्याने बापुराव कदम यांची आई गंगाबाई गेल्या दहा वर्षा पासून मुली घरी चक्री येथे राहत होत्या . बापुराव कदम यांना उत्पन्नाच काही साधन नाही . अशातच त्यांच २७ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला पैसा नाही म्हणून ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करुन त्यांचा अंत्यविधी पार पाडला . त्यांच्या दहाव्या चा विधी ४ जानेवारी रोजी होता त्याच दिवशी त्यांची आई गंगाबाई कदम ( वय ८० ) यांनी प्राण सोडला मुलाच्या दहाव्या च्या दिवशी आईचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे . बापुराव कदम ( वय ६० ) यांचे निधन झाल्याने सर्व संसाराची जवाबदारी त्यांच्या पत्नी वर येऊन ठेपली त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले तर एक मुलगी मतीमंद आणि एक मुलगा मतीमंद आहे . या कुटुंबाला शासनाने काही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत असून , शासनाच्या योजना चा या कुंटूबाला लाभ मिळावा या करीता प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत सद्स्य भाऊसाहेब देशमुख यांनी सांगीतले .