
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून दिनांक ६ जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी पंचायत समिती कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे साजरा करण्यात आला.यावेळी पत्रकारांचा सन्मान व सत्कार सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पटेल यांनी केले.
यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर,सरपंच महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे,प्रमुख उपस्थिती पावर ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष मनोहर मुरकुटे,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सुधाकर टिपरे,विस्तार अधिकारी सुनील गवई,जिल्हा परिषद शाखा अभियंता जायभाय,तानुबाई ब्रिजे प्रामुख्याने उपस्थित होते.तर पत्रकार हा आपल्या लेखनातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम २४ तास सेवा देत असतो.असे पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी यावेळी अध्यक्षीय भाषणात आपले मत मांडले. तळागाळातील उपेक्षित वर्गावर होणारा अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असतो पत्रकाराच्या कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पटेल यांनी सत्काराचे आयोजन केले होते.यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवदास मते तसेच अशोक पिंजरकर,सुरेश साबळे,प्रेमदास तायडे,प्रविण बोके,गजानन चांदुरकर,सुनील माकोडे,राजेंद्र झाडे,सचिन अब्रूक,नागेश गोळे,सुधाकर टिपरे,जावेद शहा,गिरीश लोकरे,राजेंद्र भुडेकर,महेंद्र भगत,सागर साबळे,रविंद्र वानखडे,मनोज मेळे,उमेश काकड,जयेंद्र गाडगे,सौदागर,अनंत मोहोळ,पवन गोतमारे,संघरतन सरदार,सुशील बहिरे,महेश वाकपांजर,श्रीकांत नाथे,मंगेश इंगळे,कळमकर,रमेश सावळे,मनोज मुरकुटे, नंदकिशोर पाटील,कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल शिंगणे यावेळी उपस्थित होते.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा इतिहास
‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत.६ जानेवारी १८१२ ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते.पण त्यांच्या विचारांचा ठेवा,कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे.बाळाशास्त्री जांभेकर यांचे पहिलं मराठी दैनिक ६ जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१९ व्या शतकाच्या सुरूवातीला जेव्हा भारतामध्ये ब्रिटीश राजवटीची सुरूवात झाली होती तेव्हा त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे विद्याविभुषित,पंडीत व्यक्तिमत्त्व काम करत होते.‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्या इतपत ज्ञान कमवले.इ.स.१८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी ‘बेंगॉल गॅझेट’ या साप्ताहिकानंतर बाळशास्त्रींनी ५० वर्षांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं.
दर्पण ६ जानेवारी १८३३ ला प्रसिद्ध झाला आणि अवघ्या २० वर्षांच्या पण पंडीत असणार्या बाळशास्त्री जांभेकरांनी संपादकपदाची धुरा सांभाळली.जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले.मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली.दर्पण साडेआठ वर्ष चालला.नंतर जुलै १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला होता.बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले.समाजातील वर्ण व्यवस्था,जातीभेद,स्त्री दास्य,सती,अस्पृश्यता,बालविवाह यांवर त्यांनी दर्पणच्या माध्यमातून लिखाण केल्याने त्यांना आद्य समाजसुधारकही म्हटलं जाऊ लागले.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना या दहा भाषाचे ज्ञान होते
बाळशास्त्रींना मराठी,संस्कृत,बंगाली,गुजराती,कानडी,तेलुगू,फारसी,फ्रेंच,लॅटिन आणि ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते.भाषांसोबतच विज्ञान,गणित,भूगोल,शरीरशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयांचीही चांगली जाण होती अशी माहिती यावेळी ज्येष्ठ पत्रकार यांनी दिली.