
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा आज मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती दिनी बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले, प्रेस क्लबचे अध्यक्ष दुर्गस कर्णवार उपाध्यक्ष श्री रमेश राठोड तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले आज लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासमोर अनेक आव्हाने आहेत. ही आव्हानं पेलून निःष्पक्ष, लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.
बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पञकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
भाषेत गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.
त्याचवेळी इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले. सावळी सदोबा येथे पत्रकार जयंती साजरा सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या भाषणातून बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला अनेक विषयावर पत्रकारांच्या होत असलेल्या अन्यायावर पत्रकारांनी पेटून उठण्याची गरज आहे कारण भ्रष्टाचाराची बातमी प्रकाशित केली तर अनेक पत्रकारावर हल्ले झाले पण शासनाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा हे फक्त कागदावरच राहिला या कायद्यासाठी पत्रकारांनी एक जुट होऊन कायद्याचे प्रमाणे गुन्हा हल्लेखोरावर दाखल व्हायला पाहिजे याकरिता पत्रकारांनी पेटून उठणे काळाची गरज आहे अनेक विषयावर पत्रकार आणि प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेस क्लब संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश कर्णेवार हे होते सूत्रसंचालन सुरेश पवार यांनी केले प्रस्ताविक प्रमोद जी कोटावर यांनी केले आभार अविनाश चव्हाण यांनी केले यावेळी राम पवार रुपेश खरतडे सुरेश राठोड, रमेश भाऊ राठोड महोमद
सर्वे जे बी पठाण अमीन चव्हाण आसिफ सुमार योगेश शिवणकर अमित ठाकरे श्रीकांत देशमुख सुरेश राठोड राहुल राऊत ,सचिन जुनघरे दिगंबर जाधव खुशाल जाधव हिरासिंग राठोड,