
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर जयंतीला दर्पण दिन साजरा होतो.याचे औचित्य साधून मुखेड तालूका काॅंग्रेस च्या वतीने सर्व पत्रकार बांधवाच्या सन्मान समारंभ ओमसाई काॅंफ्रन्स हाॅल येथे आयोजीत केला होता.सर्व मान्यवर पत्रकारांचा शाल पुष्पहार व पेन देवून सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना माजी जि.प.अध्यक्ष दिलिपराव पाटील बेटमोगरेकर यांनी नवनिर्वाचीत तालूका अध्यक्ष राजीव पाटील रावणगांवकर यांच्या नेतृत्वात काॅंग्रेसची संघटनात्मक बांधनी करून तालूक्यातील काॅंग्रेस मजबूत करून पुर्वीचे वैभव परत मिळविण्याचा मनोदय जाहीर केला.पुढे बोलतांना त्यांनी मवीआ सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबांनी मुखेड तालूक्यासाठी तब्बल दोनशे कोटींच्या योजना मंजुर केल्या आहेत.त्यातील बहूतांशी तालूक्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार्या होत्या.मात्र सरकार बदलले अन् मतलबी लोकांनी त्या योजनांना स्थगीती दिली कांहि योजना बदलण्याचा घाट घातला आहे हे तालूक्याच्या विकासासाठी मारक ठरणार आहे.स्वतः कांही करायच नाही अन् केलेल होवू द्यायच नाही ही नकारात्मक भूमीका लोकांना आवडली नाही.
तालूक्यातील योजनांचा आढावा घेताना दिलिप पाटिल यांनि सांगीतले की मुखेड शहराचा नांदेड बिदर रोड ला बायपस मंजुर केल्याचे सांगून तो तेरा गावांच्या फायदाचा आहे शहराच्या वाढीसाठी विकासासाठी महत्वपूर्ण आहे त्यासाठी ८५ कोटी अशोकरावांनि मंजुर केले त्यातील १५ कोटी नियोजनही झालते पण नव्या शिंदे सरकारने ते अडवून ठेवले.नाबार्डच्या माध्यमातुन बेटमोगरा टाकळि पुल,बेळी बुजरुक पुल,बार्हाळी पुल अशा तालूक्यातील महत्वपूर्ण पूलासाठी सुमारे पन्नास कोटी ची कामे मा.अशोकरावांनी मंजुर केल्यात त्या प्रशासकीय मान्यता मीळाल्या त्या पूर्ण होतीलच.तसेच विविध गावांच्या पुनर्वसनासाठी साडेसोळा कोटींचा नीधी स मान्यता मिळेलेली होती त्यासही शिंदे सरकारने स्थगीती दीली होती मात्र मा.आ.हणमंतराव पाटील व मा.आ.अविनाश घाटे यांनी ऊच्च न्यायालयात याचीका दाखल केल्यामुळे या कामावरील स्थगीती मा.उच्च न्यायालयाने ऊठवीली ती ही कामे लवकरच सुरु होतील.शहराच्या विकासासाठी मोतिनदीची सुरक्षा भिंतीसाठी दोन कोटी ईतर रस्त्यासाठी दीड कोटी असा साडेतीन कोटीचा नीधी मंजुर केला होता त्या योजनांनाही कथीत कार्यसम्राटांनी थांबवून ठेवल्या आहेत.त्यात बदल करण्याचा चंग बांधून शहराच्या विकासात अडथळा आणन्याचे काम करीत आहेत परतूं आंम्ही त्यांचे मनसूबे पुर्ण होवू देणार नाही.तालूक्यातील तीन विज ऊपकेंद्रे,तहसिल कर्मचार्यांच्या निवासस्थाना साठी दीड कोटींची यौजना असो २५१५ वैशिष्ट्यपूर्ण योजना अशा विविध योजनांच्या अंतर्गत अनेक कामांना मा.अशोकराव साहेबांनी मंजुरी दिली प्रशासकीय मान्यताही मिळाली पण ती कामे सुद्धा या शिंदे सरकारने स्थगीत केलीत.मवीआ सरकार अजून टिकले असते तर नांदेड जिल्हा असो वा मुखेड तालूका नक्कीच विकासात गती घेतलेला दीसला असता.आताचे लोकप्रतिनीधी प्रभावहीन आहेत न यांचे सरकारात कोणी ऐकते न यांची कुवत आहे.अनावशक वाद निर्माण करून जनतेची दिशाभुल करून भांडन लावायची काम मात्र चालु आहेत.शेतकर्यांना अतिवृष्टीचे पन्नास टक्केच मंजुरी मीळालेत तिकडे पश्चीम महाराष्ट्रात दुप्पट देतात अन् नांदेड जिल्हाला डावलले जाते.पिकवीमा ही असाच पंचवीस टक्के तो ही निवडक शेतकर्यांनाच मिळालाय.एकंदरीत आमदार असो की खासदार यांच कांहिही चालत नाही.बोधन मुखेड लातुर रोड मार्ग मंजुर झालाय टोकन नीधी ही मीळाला होता पण पाठपुराव्या अभावी थंड्या बस्त्यात आहे.नांदेड बिदर,कंधार खानापुर या राष्ट्रीय महामार्गाचीही अशिच दुरावस्था गेल्या नउ वर्षापासून ही कामे रखडवली जात आहेत शेतकर्यांच्या जमीनीचा मावेजा मिळत नाही,वनविभागाने अडवीलेले अंबुलग्याजवळचा मार्ग असाच ऊखडून ठेवला आहे त्याकडे अगदी आमदांराच्या ऊशाला असला तरी ही त्यांचे लक्ष जात नाही अशिच अवस्था तालूक्यातील रस्त्याचिं झालेली आहे.या सर्व प्रश्नांची सोडवणूक करणे हेच काॅंग्रेसचे ऊदीष्ट आहे.येणार्या काळात आंम्ही खंबीरपणे कामे करू शहरात पक्षाचे कार्यालय ही सुरु होइल.सर्व फ्रंटलचे अध्यक्ष,शहराध्यक्ष तालूका कार्यकारिणी या सर्व संघटनात्मक बाबी पुर्ण केल्या जातिल.बुथ कमीट्यांचे पूर्ननिर्माण करण्यात येइल.आलेली मरगळ झटकून जोमाने कामाला लागु फक्त जसे आजपर्यंत आपणां पत्रकार बांधवांचे सहकार्य लाभले तसेच यापुढेही लाभावे तुंम्ही तळमळीने जनतेचे प्रश्न मांडता आंम्हालाही मार्गदर्शन मिळते.यातूनच सर्वांच्या समन्वयाने तालूक्याचा परीपूर्ण विकास साधु या.
येणार्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जसे मार्केट कमीटी,पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगर पालीका या सर्व निवडणूका ताकदीने लढवून काॅंग्रेस बळकट करुन २०२४ च्या विधानसभेवर काॅंग्रेसचाच झेंडा फडकवू अशी ग्वाही देवून सर्व पत्रकार बांधवाना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देवून आभार व्यक्त केले.
यावेळी सर्व पत्रकार बांधव, उपस्थित होते तसेच तालूका अध्यक्ष मा.राजीव पाटील रावनगांवकर,तालूका यूवक काॅं.अध्यक्ष संतोष बोनलेवाड,जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे,रामेश्वर पाटील इंगोले,विशाल गायकवाड,हेमंत घाटे,सूनील आरगाळे,बालाजी वाडेकर यांची उपस्थीती होती.