दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शिक्षकांचे नेतृत्व करणारे व चव्हाण कुटुंबियांकडून शैक्षणिक वारसा लाभलेले जि.प.प्रा.शाळा भाद्राचे आदर्श, उपक्रमशील,कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक,सामान्य शिक्षकांच्या सुखदुःखात आत्मीयतेने सहभागी होणारे, शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे अविरत संघर्ष करून शिक्षकांना न्याय मिळवून देणारे, निर्भिड, एक उत्साही, मनमिळाऊ, प्रेमळ, दिलखुलास व अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून ज्यांना संबोधले जाते असे एक आदर्श व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातील नाव म्हणजे विठूभाऊ चव्हाण. यांच्या ५२ वा अभिष्टचिंतन दिनी लोहा तालुका भरात विविध उपक्रमांचे आयोजन करून एक आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला.असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या शुभेच्छांचा वर्षाव केला.
दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी शिक्षक नेते विठ्ठूभाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील धावरी येथील जि. प. प्रा.शाळेत मु.अ. तथा राजर्षी शाहू शिक्षक पतसंस्था माजी चेअरमन बी.वाय चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. विठ्ठूभाऊ चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन दिनी जि.प.प्रा.शाळा पांगरी,भाद्रा,भाद्रातांडा,जि.प.प्रा.शा.शेवडी तांडा,जि.प.प्रा.शाळा खांबेगाव ये तसेच जि प प्रा शा बोरगाव (आ) येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना पेनचे वाटप करून
विठुभाऊंना शाळेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. जि.प.प्रा .शा. सोनमांजरी तांडा येथे विठुभाऊ चव्हाण यांच्या सौजन्याने सर्व विदयार्थांना वही व पेन वाटप करण्यात आले.जि.प.प्रा.शाळा जवळा दे एक पेन एक वही लेखन साहित्य वाटप करण्यात आले.तर लोहा शहरापासून जवळच असलेल्या पोलीस वाडी जि.प.प्रा.शाळेत शैक्षणिक साहित्य, प्रत्येक विद्यार्थीला पेन २०० पेनांचे वाटप करण्यात आले. सदरिल या कार्यक्रमात शालेय समिती अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टापने विठूभाऊ चव्हाण यांच्या अविरतपणे न थकता चालू असलेल्या कार्याचे कौतुक करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.
आपले आद्य कर्तव्य पार पाडून विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या महान व्यक्तींमध्ये शिक्षक नेते विठूभाऊ चव्हाण यांच्या प्रकर्षाने उल्लेख केला जातो.विठूभाऊ व त्यांचे शेकडो, हजारो चाहते स्वत: जातीने लक्ष घालून दरवर्षी वाढदिवसानिमित्त गरीब, होतकरू व अनाध मुलांना आवश्यक साहित्य वाटप करणे,अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करणे वॄक्षारोपण, यासारखे विविध सामाजिक उपक्रम घेऊन अगदी साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करीत असतात.हि बाब खरोखरच अभिनंदननीय व प्रसंशनिय असल्याचे अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवत व्यक्त केले आहे.
शिक्षक नेते विठ्ठूभाऊ चव्हाण म्हणजे उत्तम संघटन कौशल्य, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या, उपक्रमशील, आदर्श व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो व आपले जीवन सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे व आनंददायी जावो. उत्तरोत्तर भविष्यात आपल्या हातून सामाजिक उपक्रम होवोत हीच मनापासून शुभेच्छा.
— बी. वाय. चव्हाण मु.अ.


