दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
बिलोली तालुका ११ रोज बुधवार ठिक १२ वाजता बिलोली जय मल्हार सेनेच्या वतीने तहसील कार्यालय बिलोली येथे निवेदन देण्यात आले ते आसे की अनेक वर्षा पासुन मागणी आहे की अहमदनगर चे नाव राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर आसे नामकरण करण्यात यावे यासाठी अनेक वर्षा पासुन आनेक आंदोलने करण्यात आली आहेत त्या मागणीला पाठिंबा म्हणुन बिलोली येथे निवेदन देण्यात आले की लवकरात लवकर अहमदनगर चे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामकरण लवकरात लवकर करण्यात यावे नाही केल्यास सखल धनगर समाजाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल आसे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्या प्रसंगी
जय मल्हार सेना जिल्हा प्रमुख नांदेड. शिवकांत मैलारे. देगलूर बिलोली विधानसभा प्रमुख नभाजी वाघेकर . बिलोली तालुका अध्यक्ष शंकर भंडारे व शहर प्रमुख ज्ञानेश्वर शिरगिरे ब. स .पा तालुका अध्यक्ष हनुमंत मुद्दनकर ज्ञानेश्वर देवकत्ते विठ्ठल तुकडेकर एकनाथ शिरगिरे. तसेच आणेक अहील्या प्रेमी उपस्थित होते


