दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर: रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये ५० व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे समारोप मोठ्या थाटामाटात साजरा झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, पंचायत समिती शिक्षण विभाग अहमदपूर आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल रूद्धा अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५० व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि ९-१० जानेवारी असे करण्यात आले होते. या समारोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेशदादा हाके पाटील, विस्तार अधिकारी बालाजीराव शिंदे, संस्थेचे सदस्य कुलदीपभैय्या हाके पाटील, सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शिवालिकाताई हाके,बीआरसीचे विज्ञान विभाग प्रमुख ज्ञानोबा सुकरे,परीक्षक सुरेंद्र यलमटे,परीक्षक अरूण महाळणकर, सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रूथ चक्रनारायण आदींची उपस्थिती होती.
यावेळी ज्ञानोबा सुकरे म्हणाले की,अगदी मेट्रोसिटीतील कन्वेंट स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्यासारखे नियोजन सम्राट चंद्रगुप्त मौर्यच्या टिमने केले होते.तर परीक्षणाच्या वेळी विविध प्रश्नांवर विद्यार्थी चटकन उत्तरे देत होती.तर यावेळी गणेशदादा हाके म्हणाले की, सौर ऊर्जा ही न संपणारी ऊर्जा असल्याने वीजेच्या दृष्टीने आपण स्वावलंबी होण्यासाठी सौर ऊर्जा शिवाय आपणास पर्याय नाही.लहान वयापासूनच मुलांच्या मनात नैसर्गिक संपत्तीचा वापर मानवी जीवनासाठी करण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. तर अध्यक्षीय भाषणात ढोकाडे यांनी श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी म्हणत नवनवीन प्रयोगाने विद्यार्थी अधिक क्रियाशील व चिकित्सक बनतो असे सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांतून राजवीर हाके यांनी तर उपस्थित मार्गदर्शक शिक्षकांतून संजय सिरसाठ आणि शिवानंद उंदीरकल्ले यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी केंद्र प्रमुख राजकुमार नलवाड,दिलीप रोकडे,अशोक शिंदे,शेख मन्नान,कामाक्षी पवार,मनिषा गुणाले, इंदुमती जोगदंड,रत्नप्रभा मंडलवार ,जाधव संतोष ,केंद्रे सोमनाथ,सिद्दिखी सईद अहमद,मोघे चंद्रकांत,दिगांबर डिकळे, नामदेव बिलापट्टे, सर आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जिलानी यांनी केले तर आभार सांगळे संभाजी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिना कल्लूरकर,अंजली बोधनकर,स्नेहा ओझा,ज्योत्सना स्वामी,ॠत्विक पोले,आयुषी पोले,शेख मोसीन,भरत कानवटे, शुभांगी सूर्यवंशी,केशव तोंडारे,चंदा काडवादे,सुभद्रा महाजन,अंगद सुरनर,राणी सुरनर आदींनी परिश्रम घेतले.


