दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
बाजारपेठेचे प्रमुख शहर असलेले मुखेड नगर परिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारीची निवड करण्यात यावी अशी मागणी आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुखेड नगर परिषदेत गेल्या अनेक दिवसापासून मुख्याधिकारी पद रिक्त आहे. तत्कालीन मुख्याधिकारी धनंजय थोरात यांची प्रशासकीय कारणामुळे बदली झाल्यापासुन एक महिन्यात दोन अधिकाऱ्याकडे प्रभारी पदभार देण्याचे आदेश निर्गमीत झाले आहे . सद्या मुखेड महसुल प्रशासनातील नायब तहसिलदार विजयकुमार पाटे यांच्या नावे प्रभारी मुख्याधिकारी पदाचे आदेश ( दि .३० डिसेंबर ) काढण्यात आले. परंतु त्यानी अजुनही पदभार स्विकारला नाही . यामुळे मुखेड नगर परिषदेतील अनेक कामे खोळंबली आहेत. प्रभारीराजमुळे शहरातील स्वच्छता , पाणी पुरवठा , मालमत्ता कर वसुली , प्रधानमंत्री आवास योजनेतील अनेक कामे प्रलंबीत , गुंठेवारीची कामे यासह नगर पालिका प्रशासनाचे मुलभुत सुविधाकडे दुर्लक्ष होत आहे . महसुल विभागातील अधिकाऱ्यांना नगर परिषद प्रशासनाचा अनुभव नसल्यामुळे प्रशासकीय कामासाठी या अगोदर त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे. म्हणून आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यायलात निवेदन देऊन म्हटले की, तात्काळ मुखेड नगर परिषदेला मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी मुख्याधिकारी म्हणुन नियुक्ती करावी अथवा नगर परिषदेत कार्यरत राज्य स्तरीय संवर्ग कर्मचाऱ्या पैकी अनुभवी कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पदाचा पदभार देवुन नागरीकांची होणारी हेळसांड थांबवावी. यावेळी ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफचे जिल्हाध्यक्ष शेख रियाज चांदपाशा, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सोनसळे, जिल्हा महासचिव वलियोद्दीन फारुखी, सय्यद मुजीब अहमद, गौतम लंके, मोहसीन शेख, वजीर भाई सलगरकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.


