दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
“अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणे” च्या वतीने निर्मित “श्री मंडई म्हसोबा दिनदर्शिका २०२३” चा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय “श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे” (पक्षप्रमुख: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या हस्ते पक्षाच्या उपनेत्या “ॲड. सुषमाताई अंधारे” यांच्या विशेष उपस्थितीत कलानगर, मुंबई येथील मातोश्री या उद्धव साहेबांच्या निवासस्थानी पार पडला.
अवघ्या हिंदुस्थानचे सत्ताकेंद्र असलेल्या ठिकाणी ट्रस्टच्या या छोटेखानी कार्यक्रमास उद्धव साहेबांनी आपल्या मातोश्री स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंती दिनी अर्थात ममता दिनी विशेष वेळ काढून ट्रस्ट परिवारास मोलाची प्रेरणा दिली. ट्रस्टच्या कार्याची थोडक्यात माहिती घेऊन, कार्य अहवालाचे कौतुक करीत उद्धव साहेबांनी सर्वांनी असेच एकत्र राहून धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अशाच प्रकारे कार्यरत राहण्यास सूचित केले.
या अनमोल स्वप्नवत क्षणांबद्दल कृतज्ञ होत ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष “राहुल सूर्यवंशी” आणि विश्वस्त उपाध्यक्ष “निवृत्ती जाधव” यांनी सन्माननीय उद्धव साहेबांचा ट्रस्टच्या वतीने सन्मान केला अन् मनापासून आभार मानले. या प्रसंगी ट्रस्टचे सदस्य योगेश निकम, शेखर पवार, हर्षद पोरे, सुधीर साकोरे आणि शशांक गोसावी उपस्थित होते.


