दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी- शहाबाज मुजावर.
कॉइन टाका, पिशवी घ्या; पाण्याची रिकामी बॉटल टाका, चॉकलेट घ्या.पाण्याची रिकामी बॉटल टाका.. चॉकलेट घ्या तसेच दहा रुपयाचे कॉइन टाका आणि कापडी पिशवी मिळवा हा नावीन्यपूर्ण उपक्रम पन्हाळा नगरपरिषदेने आजपासून चालू केला. त्यासाठी प्लास्टिक बॉटल वेंडिंग मशीन तीन दरवाजा या व्यापारी परिसरामध्ये तर कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसस्थानक परिसरामध्ये बसवले आहे. प्लास्टिकच्या पिशवीला पर्याय म्हणून प्रशासनाने कापडी मशीन बसून नागरिकांना ही सुविधा दिली आहे तसेच रिकाम्या प्लास्टिक बॉटल पर्यटकांनी, नागरिकांनी इतरत्र कुठेही न टाकता प्लास्टिक बॉटल वेंडिंग मशीन चा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी केले आहे. राज्य शासनामार्फत संपूर्ण राज्यात २०१८ पासून सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घालण्यात आलेले असून त्याची अंमलबजावणी पन्हाळा शहरात नियमित होताना दिसते. यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात वारंवार प्लास्टिक विरुद्ध मोहीम राबवली जाते.प्लास्टिक साठा, प्लास्टिक वापरणाऱ्या व्यवसायिकावर कारवाई नगर परिषदेने केली आहे. एकीकडे प्लास्टिक कॅरीबॅगला बंदी घालत असताना त्याला पर्याय देण्याची मागणी नागरिकानातून होत होती. यापूर्वी नगरपरिषदेने तसेच युनियन बँकेच्या सहकार्याने नगरपरिषदतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे. दरम्यान, इनर व्हील क्लब कोल्हापूर यांच्याकडून सी एस आर फंडातून या दोन्ही मशीन नगरपरिषदेस आज सुपूर्त करण्यात आल्या यावेळी इनर व्हील क्लब कोल्हापूर यांचे सर्व पदाधिकारी, प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल आणि नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वर्ग आदीउपस्थित होते.


