दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर
गावागावांत जल्लोष साजरा झाला. पराभूत उमेदवारांच्या गोटात शांतताही होती. अशावेळी समाजमाध्यमांवर ‘झाले इलेक्शन, जपा रिलेशन’ अशाप्रकारचे संदेश व्हायरल झाले. विजयी उमेदवारांचे सरपंचाचे उपसरपंचाचे अभिनंदन करतानाच गावातील वातावरण शांत करण्याचाच प्रयत्न यानिमित्ताने सुरू होता. ग्रामपंचायत निवडणुकांत नेहमीच प्रचंड चूरशीची असते. हा सत्तासंघर्ष प्रत्येक गल्लीत आणि घरापर्यंतही पोहोचलेला असतो. गेले 20ते 25 दिवस या संघर्षाने तालूका ढवळून निघाला आहे. निकाल जाहीर होताच काही ठिकाणी ताण तणावही झाला . तसेच ग्रामपंचायतीतील निवडणूक निकालाचा वचपा एरव्हीच्या दैनंदिन….कामात काढले जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे राजकीय सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी गावागावांतील समजूतदार लोकांनी अशाप्रकारचे संदेश व्हायरल केले आहेत अशा संदेशाणा समाजमाध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळतोय.
‘गुलाल कोणाचाही असो, माणसे आपलीच आहेत. कोणताही जय, पराजय हा अंतिम नसतो. शांत राहा, संयमी राहा. मागील १५ दिवसांत ज्या लोकांना हात जोडत होता, त्यांना त्रास होईल असे न वागता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, भविष्यासाठी राग, विरोध, द्वेष विसरून एक व्हा. निवडणुका संपल्या. राजकीय हेवेदावे बाजूला गावाच्या विकास कामाला लागा पराभव झालेल्यानी पराभव मान्य करावा विजय झालेल्यानी जास्त मस्ती न करता शांतता राखा असेही आव्हानही समाज माध्यमातून केलं जात आहे.
🎆 दोस्ताना दुरावला , गल्लीत दोन पार्ट्या
इलाक्षणच्या पहिले एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी असणारे आणि रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या मैत्रीच्या नात्यातही काही ठिकाणी य राजकारणामुळे कटुता आली आहे. कुठे भाऊबंदकीसाठी मैत्री तुटली; तर काही ठिकाणी मैत्रीसाठी भाऊबंदकीत वांदे झाले. त्यामुळे ‘झाले इलेक्शन, आता जपा रिलेशन’ हा माध्यमांवरील संदेश सर्वांनाच भावला. प्रत्येकाशी संबंधित असणारा हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न समजूतदार मंडळीकडून चालू आहे.
🎆 रक्ताची नातीही आमने सामने
ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी रक्तातील नातीही एकमेकांविरोधात लढली आहेत. अशामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. भाऊबंदकीमध्ये वादाला तर् निवडणुकीचीच झालर असते. पराभवाचे खापरही भावकीवरच फोडले जाते. त्यामुळे वाद उफाळून येतात. हे टाळण्यासाठीही काही ठिकाणांवरून प्रयत्न होताना दिसले. त्यासाठी असे चांगले संदेश समाजमाध्यांमवर गाजले.मागील दिवस अशाप्रकारचे संदेश माध्यमांद्वारे व्हायरल करण्यात आले.


